मुंबई : टीम इंडिया सध्या बांगलादेश दौऱ्यावर (India Tour Of Bangladesh 2022) आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. यादरम्यान कर्णधारपदी मुंबईकर अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) कर्णधारपदी (Captaincy) निवड करण्यात आली आहे. आगामी रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेत अजिंक्य रहाणे मुंबईचं (Mumbai) नेतृत्व करणार आहे. रणजी ट्रॉफीसाठी एमसीएने मुंबई संघाची (mumbai squad for Ranji Trophy) घोषणा केली आहे. (ranji trophy 2022 mumbai squad announced ajinkya rahane give captaincy prithvi shaw)
रणजी स्पर्धेच्या 13 व्या मोसमाची सुरुवात ही येत्या 13 डिसेंबरपासून होणार आहे. तर महामुकाबला अर्थात फायनलचं आयोजन हे 16-20 फेब्रुवारीदरम्यान करण्यात आलं आहे. दरम्यान मुंबई आपला पहिला सामना हा आंध्र प्रदेश विरुद्ध खेळणार आहे. तर दुसरा सामना 20 डिसेंबरला हैदराबाद विरुद्ध असणार आहे.
Squad Announcement
Experienced players, fresh faces, and exciting talent makes a formidable Ranji Trophy squad of 2022/23
Congratulations to one and all, make it count and bring it home #MCA #Mumbai #Cricket #IndianCricket #BCCI pic.twitter.com/q2b6MiDF7h
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) December 5, 2022
अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, यशस्वी जयस्वाल, अरमान जाफर, सरफराज खान, सुवेद पारकर, हार्दिक तामोरे, प्रसाद पवार, शम्स मुलानी, तनूष कोटीयन, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, सिद्दार्थ राऊत, रोयस्टन डायस, सूर्यांश शेंडगे, शंशाक अत्तार्डे आणि मुशीर खान.