महिला क्रिकेट संघाला शुभेच्छा देताना राजीव शुक्ला चुकले

ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना भारती महिला क्रिकेट संघाने चमकदार कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. टीम  इंडियावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. आयपीएलचे चेअरमन आणि राज्यसभा सदस्य राजीव शुक्ला यांनीही ट्विटरच्या माध्यमातून टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. पण चुकीच्या ट्विटमुळे राजीव शुक्लांवर टीकेचे धनी झालेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 21, 2017, 04:48 PM IST
महिला क्रिकेट संघाला शुभेच्छा देताना राजीव शुक्ला चुकले  title=

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना भारती महिला क्रिकेट संघाने चमकदार कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. टीम  इंडियावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. आयपीएलचे चेअरमन आणि राज्यसभा सदस्य राजीव शुक्ला यांनीही ट्विटरच्या माध्यमातून टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. पण चुकीच्या ट्विटमुळे राजीव शुक्लांवर टीकेचे धनी झालेत.

बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवून महिला क्रिकेट संघाने फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. संपूर्ण देशभरात टीम इंडियाच्या कामगिरीचं कौतुक होतआहे. दरम्यान, महिला क्रिकेट संघाने नेमके कोणत्या स्पर्धेत यश मिळवलंय हेच राजीव शुक्ला विसरले. 

राजीव शुक्ला  यांनी वर्ल्डकप स्पर्धेऐवजी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केल्याबद्दल टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. शुक्ला यांच्या या ट्विटनंतर नेटिझन्सनी त्यांची चांगलीच खिल्ली उडवली. त्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केले.