U Mumba VS Tamil Thalaivas in PKL 11: अजित चौहान आणि अमिरमेहमूद झफरदानेशची अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर यु मुम्बाने प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro Kabaddi League) बुधवारी तमिळ थलैवाजवर 47-31 असा दणदणीत विजय मिळविला. या विजयाने यु मुम्बाने तमिळ थैलवाजला बाद होण्याच्या उंबरठ्यावर आणले आहे. या विजयासह यु मुम्बा संघ 60 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आला आहे. तमिळ थैलवाजचे स्वतःचे स्थान राखण्याचे प्रयत्न मात्र फोल ठरले. सामन्याला केलेली वेगवान सुरुवात आणि त्यानंतर नियोजन पद्धतीने या खेळात केलेले बदल हेच यु मुम्बाच्या या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. खेळाला वेग देताना आणि प्रसंगी उत्तम निर्णय घेत यु मुम्बाचे नियोजन दिसून आले. नेहमीप्रमाणे अजित चौहानने महत्वाचा वाटा उचलला. झफरदानेशच्या अष्टपैलू कामगिरीची आणि मनजीतच्या चढाईतील 8 गुणांची त्याला साथ मिळाली. लोकेशने बचावात मिळालेले ४ गुण देखिल महत्वाचे ठरले. यु मुम्बाकडून खेळलेल्या एकूण 9 खेळाडूंपैकी केवळ रिंकू वगळता प्रत्येकाने एकतरी गुण मिळविला. परवेश भैन्सवालला गवसलेली लय त्यांना समाधान देणारी ठरली. तमिळकडून मोईन शफाघीला (10) अन्य सहकाऱ्यांकडून तगडी साथ मिळू शकली नाही.
उत्तरार्धाला सुरुवात झाली तेव्हा यु मुम्बाने पहिली दहा मिनिटे संपली तेव्हा खेळावर नियंत्रण सुटणार नाही याची काळजी घेतली. अजित चौहान, झफरदानेश, मनजीत यांच्या चढाया मुम्बासाठी गुण वसूल करत होत्या. तर तमिळकडून मोईन शफाघी झुंज देत होता. उत्तरार्धाच्या पहिल्या टप्प्यात तरी चढाईपटूंचेच वर्चस्व राहिले होते. या टप्प्यात दोघांनाही बचावात केवळ प्रत्येकी दोन गुणांची कमाई करता आली होती.
हे ही वाचा: Video: आयपीएलचे दोन दमदार खेळाडू मैदानात भिडले, उपांत्यपूर्व सामन्यात एकमेकांना भिडले
उत्तरार्धात मुम्बाला परवेश भैन्सवालला लय सापडली. त्याहीपेक्षा सोमवीरच्या जागी संधी मिळालेल्या लोकेश घोसालियाने केलेली चमकदार कामगिरी केली. उत्तरार्धात अखेरच्या टप्प्यात मुम्बाने पुन्हा वेग घेतला आणि तिसऱ्यांदा तमिळ संघावर लोणची नामुष्की आणली. यावेळी मम्बाची 41-26 अशी भक्कम स्थिती राहिल्यामुळे उर्वरित पाच मिनिटांत मुम्बाने आपल्या राखीव चडाईपटूंची चाचणी करुन घेतली.
हे ही वाचा: Fridge Vastu Tips: 'या' 5 गोष्टी चुकूनही फ्रीजवर ठेवू नका, घरातून निघून जाईल सुख-समृद्धी
हे ही वाचा: सर्वात उंच हॉटेल...105 रूम्स, पण 55 अब्ज रुपये खर्चून बांधलेल्या 'या' वास्तूमध्ये कोणीच येत नाही, कारण...
सामन्याला कमालीची वेगवान सुरुवात झाली होती. यु मुम्बाने चढाई आणि बचावाच्या जोरावर पहिल्या पाच मिनिटांत तमिळ थलैवाज संघावर लोणची नामुष्की दिली होती. तेव्हा यु मुम्बाचे 9 गुण होते, तर तमिळला अजून खाते उघडता आले नव्हते. पणल लोणनंतर चित्र इतके बदलले की पुढच्या पाच मिनिटांत मुम्बाला संघाला केवळ एक गुण मिळवता आणि लोण स्विकारावा लागला. त्यामुळे पहिल्या टप्प्याला मुम्बा 10-9 असे पुढे राहू शकले. त्यानंतर यु मुम्बाने अपेक्षित खेळ संथ केला आणि नियंत्रण कायम राखण्यावर भर दिला. या बदलाचा त्यांना फायदा झाला. बचावात एक परवेश भैन्सवाल वगळला, तर मुम्बाचा प्रत्येक खेळाडू गुणांसाठी धडपडत होता. भैन्सवालचे पूर्वार्धातील दोन्ही प्रयत्न असफल ठरले होते. अर्थात, मुम्बाकडे अजित चौहान आणि झफरदानेश यांच्या चढायांमुळे आघाडीची गाडी सुसाट राहिली. पूर्वार्ध संपता संपता यु मुम्बाने आणखी एक लोण देत तमिळला मध्यंतराला 22-14 असे अडचणीत आणले.