पाकिस्तानच्या विरोधामुळे भारतात होणाऱ्या अंडर १९ आशिया कप स्पर्धेची जागा बदलली

अंडर-19 क्रिकेट आशिया कप स्पर्धा भारतात होणार होती पण याला पाकिस्तानने विरोध दर्शवला आहे. आता पाकिस्तानच्या या विरोधामुळे अंडर-19 क्रिकेट आशिया कप टूर्नामेंट मलेशियामध्ये होणार आहे. 

Updated: Aug 13, 2017, 02:13 PM IST
पाकिस्तानच्या विरोधामुळे भारतात होणाऱ्या अंडर १९ आशिया कप स्पर्धेची जागा बदलली title=

नवी दिल्ली : अंडर-19 क्रिकेट आशिया कप स्पर्धा भारतात होणार होती पण याला पाकिस्तानने विरोध दर्शवला आहे. आता पाकिस्तानच्या या विरोधामुळे अंडर-19 क्रिकेट आशिया कप टूर्नामेंट मलेशियामध्ये होणार आहे. 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतात या टूर्नामेंटच्या आयोजनाबाबत विरोध दर्शवला आहे. त्यानंतर जागा बदलण्यात आली आहे. 

या टू्र्नामेंटचं आयोजन नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. पीसीबीने भारत आणि पाकिस्तान सरकारमध्ये सुरु असलेल्या राजकीय तणावामुळे भारत दौऱ्याला विरोध केला होता. 

या टूर्नामेंटमध्ये पाकिस्तान, भारत, बांग्लादेश आणि श्रीलंका हे संघ असणार आहेत. तर कतार, सऊदी अरब, ओमन आणि बेहरीन संघ देखील यामध्ये सहभागी होणार आहे.