मुंबई इंडियन्सचे नवे भाऊजी! 'त्या' व्हिडीओवर... आदेश बांदेकरांची हटके कमेंट

Mumbai Indians Tim David on Home Minister Video : मुंबई इंडियन्सच्या त्या व्हिडीओवर आंदेश बांदेकरांची हटके कमेंट...

दिक्षा पाटील | Updated: Mar 17, 2024, 03:04 PM IST
मुंबई इंडियन्सचे नवे भाऊजी! 'त्या' व्हिडीओवर... आदेश बांदेकरांची हटके कमेंट title=
(Photo Credit : Social Media)

Mumbai Indians Tim David on Home Minister Video : छोट्या पडद्यावरील 'होम मिनिस्टर' हा मराठमोळा शो सगळ्या महिलांचा आवडता शो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा शो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या शोचं महत्त्व म्हणजे आदेश भाऊजींकडून मिळणारी पैठणी. गेल्या अनेक वर्षांपासून आदेश बांदेकर यांचा हा शो सुरु आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मिताली मयेकरनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती पळीत्यानं एका भांड्यावर होम मिनिस्टर या कार्यक्रमाची ट्यून वाजवते आणि लगेत सिद्धार्थ चांदेकर होम मिनिस्टर असं बोलतो. आता हे क्रेझ फक्त मराठी कलाकारांपूर्यंतच राहिलं नाही तर त्यासोबतच आपल्या सगळ्यांची आयपीएलमधील लाडकी टीम मुंबई इंडियन्सला देखील लागलं आहे. 

मुंबई इंडियन्सनं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत टिम डेव्हिडंचा खास लूक आपल्याला पाहायला मिळाला आहे. होम मिनिस्टरचं गाणं वापरुन त्यांनी एक व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओतून टिम डेव्हिडचा एक नवा लूक म्हणजेच पारंपारिक वेषात पाहायला मिळत आहे. टिम डेव्हिडनं निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. तर व्हिडीओत फक्त टिम नाही तर त्याच्यासोबत काही महिला देखील दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत मुंबई इंडियन्सनं कॅप्शन दिलं की "दार उघड बये...दार उघड...टिम भाऊजी आले आहेत", असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, "डेव्हिडलं मुंबई इंडियन्सकडून नेहमीच असं हटके कॅप्शन दिलं." दुसरा नेटकरी म्हणाला, "आपली मुंबई,मराठी मुंबई." तिसरा नेटकरी म्हणाला, "टिम डेविडकर सोन्याची पैठणी घेऊन आलेत." तर आदेश बांदेकर यांनी "वाह ! 'टिम' जिंकलीच पाहीजे धाकटे भाऊजी…." आणखी एक नेटकरी म्हणाला, "डेव्हिड भाऊजी. दुसरा नेटकी म्हणाला, तोड फोड टीम भाऊ आला." दुसरा नेटकरी म्हणाला, "हिट मॅनच्या एन्ट्रीची प्रतिक्षा आहे." 

हेही वाचा : 'आधी केलं प्रपोज, मग वयावरुन उडवली खिल्ली!' अभिनेत्रीनं दिलं असं उत्तर

दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या मॅच विषयी बोलायचे झाले तर यंदाचा त्यांच्या टीमचा कॅप्टन हार्दिक पांड्या आहे. तर 20 मार्च पासून यंदाच्या आयपीएलची सुरुवात होणार आहे. यंदाच्या वर्षीची ट्रॉफी मुंबई इंडियन्सला मिळणारी अशी आशा त्यांच्या चाहत्यांना लागली आहे.