हेविवेट बॉक्सिंग चॅम्पीयन टायसन करणार तंबाकूची शेती, लोकांनी केला विरोध

जगप्रसिद्ध हेविवेट बॉक्सिंग चॅम्पीयन माईक टायसन यांना लोकांनी सध्या प्रचंड विरोध सुरू केला आहे. कारण, टायसन यांनी चक्क तंबाकूची शेती करण्याचा घाट घातला आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 2, 2018, 10:38 PM IST
हेविवेट बॉक्सिंग चॅम्पीयन टायसन करणार तंबाकूची शेती, लोकांनी केला विरोध title=

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध हेविवेट बॉक्सिंग चॅम्पीयन माईक टायसन यांना लोकांनी सध्या प्रचंड विरोध सुरू केला आहे. कारण, टायसन यांनी चक्क तंबाकूची शेती करण्याचा घाट घातला आहे.

सध्या 51 वर्षांचे असलेले टायसन यांनी डॅथ व्हॅली येथे सुमारे 40 एकर जमीन खरेदी केली आहे. या जमीनीवर तंबाकूची शेती करण्याचा टायसन यांचा विचार आहे. या प्रोजेक्टसाठी त्यांचा टायसन कल्टीवेशन स्कूलही काम करणार आहे. यात तंबाकूची शेती कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. 

अभ्यासकांचे म्हणने असे की, बॅन हटताच टायसन मोठ्या प्रमाणावर गांजा एक्सपोर्ट करण्याच्या तयारीत आहेत. यात त्यांना जे स्ट्रॉमेन आणि रॉबर्ट हिकमॅन हे त्यांचे बिजनेस पार्टनर असतील, असेही अभ्यासंकांनी म्हटले आहे.

दरम्यान, तंबाकूची शेती करण्याच्या टायसन यांच्या निर्णयाला अनेक ठिकाणांहून विरोध होत आहे. विशेषत: टायसन यांना सोशल मीडियातून विरोध होत आहे. सोशल मीडियावर नेटीझन्सनी सवाल केला आहे की, टायसन ज्या क्रीडाप्रकारात खेळले आहेत. तेथे त्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात चाहते निर्माण झाले आहेत. या चाहत्यांना टायसन तंबाखू खाण्याचे अवाहन करणार का?, असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे.