डरबन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा कॅप्टन विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेची अर्धशतकं झाली आहेत. या दोघांच्या पार्टनरशीपमुळे भारताच्या विजयाची शक्यता निर्माण झाली आहे. भारताच्या हातात आणखी ८ विकेट्स आहेत.
दक्षिण आफ्रिकेनं ठेवलेल्या २७० रन्सचा पाठलाग करताना भारताला रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या रुपात दोन धक्के लागले. रोहित शर्मा २० रन्सवर तर शिखर धवन ३५ रन्सवर आऊट झाला. मॉर्नी मॉर्कलनं रोहितची विकेट घेतली तर शिखर धवन रन आऊट झाला.
कॅप्टन फॅप डुप्लेसिसनं लगावलेल्या शतकामुळे दक्षिण आफ्रिकेला पहिल्या वनडेमध्ये सावरलं आहे. दक्षिण आफ्रिकेनं ५० ओव्हर्समध्ये २६९/८ एवढा स्कोअर केला. डुप्लेसिसनं ११२ बॉल्समध्ये १२० रन्स केल्या. डुप्लेसिसच्या या खेळीमध्ये ११ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता.
टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीपासूनच धक्के लागले. पण डुप्लेसिसनं पहिले क्विटन डीकॉक(३४), क्रिस मॉरिस(३७) आणि पेहलुक्वायोच्या मदतीनं दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला. एकवेळी दक्षिण आफ्रिकेची अवस्था १३४-५ अशी होती. भारताकडून कुलदीप यादवनं ३, युझवेंद्र चहलनं २ आणि बुमराह-भुवनेश्वर कुमारनं प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.