Kho Kho World Cup 2025 Where to Watch: देशाच्या राजधानीतील इंदिरा गांधी इनडोअर सभागृह रविवारी खो-खो विश्वचषक स्पर्धेत ( Where to watch kho kho world cup live streaming) सहभागी झालेल्या 23 देशांतील संघांच्या उपस्थितीने आनंदित झाले होते. 13 ते 19 जानेवारी दरम्यान पहिला वाहिला खो-खो विश्वचषक खेळवला जाणार आहे. यामध्ये 23 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन सर्व संघांच्या उपस्थितीत झाले. याशिवाय या उद्घाटन सोहळ्यात सांस्कृतिक विविधेची एक नेत्रदीपक झलक बघायला मिळाली. पारंपरिक भारतीय संगीताने सर्व परदेशी खेळाडूंचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे या कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आली. प्रत्येक देशाने ऐतिहासिक मेळाव्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
परदेशी संघांना भारताच्या भव्य आदरातिथ्याचा अनुभव घेता आला. त्याचवेळी परदेशी खेळाडूंनी आपल्या देशाची सांस्कृतिक झलक दाखवल्यामुळे कार्यक्रमात एक प्रकारची भव्यता आली. आफ्रिकन संघांनी केलेल्या युद्धाच्या नादाने पाहुण्या देशांचे मनोबल उंचावले, तर युरोपियन राष्ट्रांनी दाखवलेल्या नृत्यांच्या हालचालींमुळे उपस्थितांनाही ठेका धरण्याचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे मैदानात एक वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले होते.
हे ही वाचा: Rohit Sharma: रोहित शर्माने कोणाच्या सांगण्यावरून निवृत्ती घेतली नाही? जाणून घ्या
हे ही वाचा: रोहित आणि गंभीर बीसीसीआयसमोर हजर, 2 तासांच्या मिटिंगमध्ये काय झालं? झाला मोठा खुलासा
भारतात पहिल्यांदाच खो-खो विश्वचषक स्पर्धा होणार आहे. भारतीय पुरुष संघाचे सर्व सामने IST रात्री 8:15 वाजता सुरू होतील. त्याच वेळी, महिला संघाचे सर्व गट टप्प्यातील सामने संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरू होतील.
हे ही वाचा: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी 'या' स्टार खेळाडूने घेतली अचानक निवृत्ती, साधला बोर्डावर निशाणा; लिहिली भावनिक पोस्ट
खो-खो विश्वचषक स्पर्धेचा उदघाटन समारंभ १३ जानेवारी २०२५ रोजी इंदिरा गांधी मैदानावर होईल. त्यानंतर भारत विरुद्ध नेपाळ यांच्यात उदघाटनीय सामना होईल. स्टार स्पोर्ट्स, स्टार स्पोर्ट्स एचडी १, स्टार स्पोर्ट्स फर्स्टवर सामन्यांचे थेट प्रसारण होणार आहे. देशभर दुरदर्शनवरूनही स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे. त्याचवेळी डिस्ने हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुनही सामने दाखवण्यात येणार आहेत.