Shubman Gill: भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या 5 सामन्यांची टेस्ट सिरीज सुरु आहे. या सिरीजमधील तिसरा आणि शेवटचा सामना धर्मशालामध्ये खेळवण्यात येतोय. या सामन्यात भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. तर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने उत्तर खेळी करत सेंच्युरी ठोकली. दरम्यान यावेळी इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसन आणि शुभमन गिल यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचं दिसून आलं.
भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलने इंग्लंडचा सर्वात अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर शानदार सिक्स ठोकला. गिलने खेळलेला हा शॉट चाहत्यांना देखील आवडला. इतकंच नाही तर या शॉटने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सही चांगलाच प्रभावित झाला होता. मात्र, अँडरसन या शॉटवर खूश नव्हता. शुभमन गिल आणि जेम्स अँडरसन यांच्यात काही बाचाबाची झाली पण दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर शुभमन गिलने याबद्दल सांगण्यास नकार दिला.
टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी दोघांच्या भांडणाबाबत शुभमन प्रश्न केला. या सामन्यात शुभमन गिलने 150 बॉल्सचा सामना करत 110 रन्स केले. शुभमन गिलला जेम्स अँडरसनने क्लीन बोल्ड केले.
शुभमन गिलच्या म्हणण्यानुसार, खेळताना त्याला बॉल नीट दिसत नव्हता, त्यामुळे तो बाद झाला. अँडरसनशी झालेल्या बाचाबाचीवर शुभमन म्हणाला, "मला वाटतं की, ते संभाषण खाजगी ठेवणं आम्हा दोघांसाठी चांगले होईल."
भारताने पाचव्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उत्तम फलंदाजी करत इंग्लंडविरूद्ध मोठी आघाडी घेण्यास सुरूवात केली. यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने 103 तर शुभमन गिलने 110 रन्सची शतकी खेळी केली. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस टीम इंडियाने 8 बाद 473 रन्स केल्या असून 255 धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून दोन शतकं आणि दोन अर्धशतके झाली. रोहित आणि गिलच्या शतकी खेळीनंतर तर सर्फराजने 56 आणि डेब्यू करणाऱ्या पडिक्कलने 65 रन्स करत मोठी भागीदारी रचली.