Jos Buttler: लहानपणी स्वप्न पाहिलं, आज सत्यात उतरवलं...अन् बटलरने एका हातात उंचावली World Cup ची ट्रॉफी!

Jos Buttler, England cricket team : एक काळ असा होता, ज्यावेळी खराब प्रदर्शनामुळे जॉस बटलर संघातून वगळला गेला. त्यामुळे बटलर आता संपला, असं म्हटलं जात होतं. त्याचवेळी...

Updated: Nov 13, 2022, 08:08 PM IST
Jos Buttler: लहानपणी स्वप्न पाहिलं, आज सत्यात उतरवलं...अन् बटलरने एका हातात उंचावली World Cup ची ट्रॉफी! title=
Jos Buttler lifted the World Cup trophy

Jos Buttler lifted the World Cup trophy : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्या खेळलेल्या गेलेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये (T20 World Cup 2022 Final) इंग्लंडने पाकिस्तानला 5 गडी पराभूत केलं. फायनल जिंकताच इंग्लंडने  (England cricket team) दुसऱ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलंय. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीमसोबत कॅप्टन जॉस बटलरने (Jos Buttler lifted the World Cup trophy) वर्ल्ड कप उचलला आणि अखेर 12 वर्षाची मेहनत सार्थकी लागली.

एक काळ असा होता, ज्यावेळी खराब प्रदर्शनामुळे जॉस बटलर संघातून वगळला गेला. त्यामुळे बटलर आता संपला, असं म्हटलं जात होतं. त्याचवेळी बटलरने एक वक्तव्य केलं आणि त्याची खिल्ली उडवली गेली. 'मला इंग्लंडचा एबी डिव्हिलियर्स व्हायचंय', असं बटलर म्हणाला होता. त्याचं या वक्तव्याने अनेकांना हसू देखील आलं. मात्र, स्वत:वरचा विश्वास बटलरने (Jos Buttler) कधी कमी होऊ दिला नाही.

आणखी वाचा - T20 World Cup Final : पाकिस्तानचा पराभव करत इंग्लंड दुसऱ्यांदा 'जगज्जेते', स्टोक्स ठरला हिरो

बटलरला लहानपणापासून क्रिकेटचं वेड होतं. आपण मोठा क्रिकेटर व्हायचं, असं स्वप्न त्यानं उराशी बाळगलं. फक्त क्रिकेटरच नाही तर इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकवून द्यायचा, असा निश्चय देखील त्यानं केला होता. त्यामुळे लहान असताना बटलर खोटा खोटा वर्ल्ड कप बनवायचा आणि त्यांच्यातील सामना पुर्ण झाला की चांगला खेळ दाखवणाऱ्या खेळाडूच्या हातात वर्ल्ड कप ट्रॉफी देत असतं. 

पाहा व्हिडीओ- 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

त्यावेळी अंतिम सामना जिंकून वर्ल्ड कप हाती घेऊन तो आभाळाकडे उंचवण्याचं स्वप्न बटलरने लहानपणीच पाहिलं होतं. तेच स्वप्न बटलरने आज पुर्ण केलं. पाकिस्तानचा धुव्वा उडवत वर्ल्ड कप जिंकला आणि एका हातात ट्रॉफी उचलत लहानपणी पाहिलेलं स्वप्न पुर्ण केलं. एकीकाळी खराब प्रदर्शनामुळे संघातून वगळला बटलर आज वर्ल्ड कप जिंकवून खऱ्या अर्थाने 'हिरो' ठरलाय.