विराट कोहली आणि स्टिव स्मिथचा रेकॉर्ड धोक्यात, इंग्लिश खेळाडूची नजर

बाबर आझम पाठोपाठ आणखी एका दिग्गज फलंदाज कोहलीचा रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत

Updated: Jun 13, 2022, 10:52 AM IST
विराट कोहली आणि स्टिव स्मिथचा रेकॉर्ड धोक्यात, इंग्लिश खेळाडूची नजर title=

मुंबई : एकीकडे बाबर आझम विराट कोहलीचे रेकॉर्ड मोडत आहे. तर दुसरीकडे इंग्लिश खेळाडूचीही कोहलीच्या रेकॉर्डवर नजर आहे. कोहलीचा विक्रम मोडण्याच्या तयारीत इंग्लिश खेळाडू आहे. नॉटिंघम इथे इंग्लड विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात जो रूटने कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. 

इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट रन मशीन बनला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी जो रूटने शानदार शतक झळकावले. रूटचे हे सलग दुसरे कसोटी शतक आहे. यापूर्वी लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने नाबाद 115 धावांची खेळी केली होती.

रुटने आता कसोटी क्रिकेटमध्ये 27 शतके पूर्ण केली. त्याने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची बरोबरी केली आहे. त्याचा हा रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत जो रूट आहे. 

रूटने जानेवारी 2021 पासून कसोटी क्रिकेटमध्ये 10 शतकं ठोकली आहेत. त्याने जवळपास 2500 धावा केल्या. एवढेच नाही तर इंग्लंडकडून कसोटीतील 15 शतकांपैकी 9 शतकं फक्त रूटने केली आहेत. इंग्लंडच्या विजयात आतापर्यंत जो रूटचा मोठा वाटा राहिला आहे. दुसरीकडे विराट कोहली मात्र गेल्या वर्षभरापासून सतत फ्लॉप शो करताना दिसत आहे. 

जो रूटने नॉटिंघम इथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार खेळी केली. त्याने 115 धावा केल्या आणि तो नाबाद राहिला आहे. तर बेन स्टोक्सने 30 धावा केल्या. जो रूटच्या तुफानी खेळीचा फायदा टीमला झाला. 

कसोटीमधील शतक ठोकण्याचा रेकॉर्ड

जो रूट- 27 शतक
विराट कोहली- 27 शतक
स्टीव स्मिथ - 27 शतक
 डेविड वॉर्नर-24 शतक
केन विलियमसन - 24 शतक