मुंबई: IPLचे सामने ऐन रंगात आले असताना काही खेळाडू सामन्या दरम्यान जखमी होत आहेत. नुकत्याच झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता सामन्यात रोहित शर्माच्या पायाला दुखापत झाली. स्टार खेळाडू IPLमधून बाहेर झाल्यानं संघाला मोठा धक्का बसला आहे. राजस्थान रॉयल्स संघातील स्टार खेळाडू यापुढे IPLमध्ये दिसणार नसल्यानं अनेकांची निराशा झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार IPLच्या चौदाव्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. याचं कारण म्हणजे संघातील स्टार खेळाडू पुढचे सामने खेळू शकणार नाही. इंग्लंडचा ऑलाऊंडर खेळाडू असलेल्या बेन स्टोक्सला दुखापत झाल्यानं तो IPLमधून बाहेर झाला आहे.
Ben Stokes is OUT OF THE IPL after breaking a finger taking a catch in #RR’s 1st game yesterday
He may be out for longer - he will have another X-ray in the next 48 hours to assess his finger
#RR are considering replacement options pic.twitter.com/x8SyvmFKi7
Guerilla Cricket #GCFromHome (@guerillacricket) April 13, 2021
Hearing that Ben Stokes might be out of the #IPL with the injury he suffered while catching Chris Gayle. Will be a huge blow to #RR
Harsha Bhogle (@bhogleharsha) April 13, 2021
पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स झालेल्या सामन्या दरम्यान बेन स्टोक्सच्या हाताला दुखापत झाली. इंडिपेंडेन्टनं दिलेल्या वृत्तानुसार हाताला झालेली दुखापत गंभीर आहे. त्यामुळे तो पुढचे सामने खेळू शकणार नाही. क्रिस गेलनं टोलवलेला बॉल कॅच पकडताना ही दुखापत झाली होती.
सध्या इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डचे अधिकारी राजस्थान रॉयल्स संघाशी यासंदर्भात चर्चा करत आहे. स्टोक्स भारतातच असून गुरुवारी त्याच्या हाताचा एक्स रे काढण्यात येणार आहे. त्यानंतर पुढे काय करायचं याबाबत डॉक्टर ठरवणार आहेत. हाताला दुखापत झाल्यानं तो पुढचे सामने खेळण्याची शक्यता नसल्याचं सांगितलं जात आहे. जोफ्रा आर्चरलाही दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.