नवी दिल्ली: IPL 2021 उर्वरित सामने UAEमध्ये होणार आहे. यंदा आयपीएलची ट्रॉफी मिळवण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्स संघ जास्त मेहेनत घेताना दिसत आहे. चेन्नई सुपरकिंग्स संघाचे बरेच खेळाडू UAEमध्ये पोहोचले असून तिथे त्यांनी सरावही सुरू केला आहे. सरावा दरम्यान माहीचा रूद्र अवतार पाहायला मिळाला.
मे महिन्यात आयपीएलचे सामने रंगले खरे पण बायोबबलमध्ये कोरोनानं शिरकाव केल्यानं खेळ थांबला. त्यानंतर उर्वरित 31 सामने UAEमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. या सामन्यांसाठी सर्व संघांनी कंबर कसली आहे. महेंद्र सिंह धोनीचा मैदानातील रूद्र अवतार पुन्हा एकदा पाहायला मिळाला.
टीमच्या नेट प्रॅक्टीस दरम्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच पाहायला मिळाला आहे. कॅप्टन कूल धोनी यामध्ये एकामागे एक षटकार ठोकताना दिसत आहे. धोनीने ठोकलेल्या षटकारामुळे चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. यंदा आयपीएलमध्ये धोनी खूपच कमी वेळा खेळताना दिसला. त्यामुळे चाहत्यांमध्ये काहीशी निराशाही होती.
MS Dhoni Starts practice at the nets at ICC Academy#IPL2021 #Dhoni #MSD
#MSDhoni #WhistlePodu #Raina #IPL #ENGvIND pic.twitter.com/FluBhWijU2
— Crisilin Babu (@Crisilin_Tweet) August 19, 2021
धोनी यंदा शेवटचं आयपीएल खेळणार की नाही याबाबतही अनेक चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. तर आता आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात धोनी पुन्हा मैदानात खेळताना दिसणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.
CSK संघ आतापर्यंत 3 वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकला आहे. यंदाच्या हंगामातही चेन्नई सुपरकिंग्स चांगल्या पद्धतीनं खेळताना दिसत आहे. यंदा धोनीच्या नेतृत्वात चौथ्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याचा CSKचा प्रयत्न असणार आहे.