Virat Kohli- Anushka sharma at Uttarakhand : (T20 World Cup Autralia) ऑस्ट्रेलियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघाच्या (team india) वतीनं दमदार कामगिरी करणाऱ्या विराट कोहली (Virat Kohli) यानं थेट उत्तराखंडची (uttarakhand) वाट धरली. पत्नी अनुष्का शर्मा (Anushka sharma) आणि लेक वामिका (Vamika) यांच्यासह विराट कुमाऊं भागात पोहोचला. सूत्रांच्या माहितीनुसार इथं पोहोचताच त्यानं ठरल्याप्रमाणं एक गुप्त स्थळ गाठलं. आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या (baba neem karoli) बाबा नीम करोली यांचा आशीर्वाद घेतला. गुरुवारी सकाळीच अनुष्का आणि विराट दर्शनासाठी आश्रमात पोहोचले होते. (indian cricketer virat kohli visits uttarakhands neem karoli baba ashram along with wife anushka and daughter vamika)
अनेकांच्या मते सप्टेंबर महिन्यात अनुष्कानं विराटच्या शतकी खेळीनंतर बाबा नीम करोली यांचा एक फोटो शेअर केला होता. चाहत्यांच्या अनुशंगानं तिनं पतीच्या चांगल्या कामगिरीसाठीच प्रार्थना केली होती. आपण मागितलेलं हे मागणं पूर्ण झाल्याच्या निमित्तानंच तिनं आश्रमाची वाट धरली.
नैनीतालमध्ये (Nanital) असणाऱ्या भवानी अल्मोडा राष्ट्रीय महामार्गाशेजारीच कैंची धाममध्ये असंख्य भारतीय आणि परदेशी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. इथल्या बबा नीम करोली यांच्यावर अनुष्काची विशेष श्रद्धा असल्याचं सांगण्यात येतं.
भवाली येथे असणाऱ्या घोडाखाल हॅलिपॅडवर विराट आणि अनुष्का उतरले. त्यावेळी आपण आपल्या आराध्यांच्या भूमित आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला होता. उत्तराखंडमध्ये विराट आणि अनुष्का आल्याची बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरली आणि त्यांचे फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
नीम करोली किंवा नीम करोरी यांची गणती 20 व्या शतकातील महान संतांमध्ये केली जाते. उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद इथं त्यांचा जन्म झाला होता. नैनीताल, भवालीपासून 7 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कैंची धाम आश्रमाची त्यांनी 1964 मध्ये स्थापना केली होती.
आजही बाबांच्या भक्तांमध्ये त्यांच्या लीलांची चर्चा असते. दरवर्षी जून महिन्यात कैंची धाम इथं वार्षिक उत्सव असतो. फक्त भारतच नव्हे, तर विविध राज्य आणि देशांमधून असंख्य अनुयायी या ठिकाणाला भेट देतात. बाबांच्या भक्तांमध्ये खुद्द पंतप्रधान मोदी, अभिनेत्री जुलिया रॉबर्ट्स, स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकरबर्ग यांच्याही नावांचा समावेश आहे.