जोहान्सबर्ग : टीम इंडियाचा तारणहार असलेला चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) गेल्या काही काळापासून आऊट ऑफ फॉर्म आहे. पुजारा ज्यासाठी ओळखला जातो, तशी कामगिरी त्याला करता आलेली नाही. मात्र त्याने आफ्रिका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी आक्रमकपणे बॅटिंग केली. पुजाराच्या या आक्रमकपणावर 'लॉर्ड' शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) प्रतिक्रिया दिली आहे. (ind vs sa india vs south aftica 2nd test 2nd day lord shardul thakur give reaction on cheteshwar pujara batting at wanderers stadium johannesburg)
नेहमीच संथपणे खेळणाऱ्या पुजाराने दुसऱ्या दिवशी जोरदार फटकेबाजी केली. क्रिकेट चाहत्यांना पुजाराचा नवा अंदाज पाहायला मिळाला. पुजाराने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 42 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 35 धावा केल्या.
ठाकूर काय म्हणाला?
पुजाराची मनस्थिती चांगली होती. त्याने आफ्रिकेच्या गोलंदाजांच्या सुमार कामगिरीचा फायदा उचलला. तसेच पुजाराला टीम मॅनेजमेंटने काही संदेश दिल्याच्या वृत्ताचंही ठाकूरने खंडन केलं.
"पुजारा सध्या चांगली बॅटिंग करतोय. कोणाही खेळाडूसाठी टीम मॅनेजमेंटकडून खास मेसेज नाही, कारण सर्वच खेळाडू अनुभवी आहेत. प्रत्येकाच्या खेळण्याची पद्धत आणि शैली ही भिन्न असते. एखाद्या विशेष दिवशी जशी आपली भावना असते, त्याच प्रकारे पुजारा खेळला. पुजारा आज आतून फार पॉझिटिव्ह होता. त्यामुळे त्याने फटकेबाजी केली",असं ठाकूर म्हणाला.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत शार्दुलने विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. या दरम्यान शार्दुलने पुजाराबाबत प्रतिक्रिया दिली.
पुजाराची अर्धशतकी खेळी
दरम्यान पुजाराने तिसऱ्या दिवशी अर्धशतक पूर्ण केलं. मात्र त्यानंतर तो बाद झाला. पुजाराने 86 चेंडूत 10 चौकारांसह 53 धावा केल्या. पुजाराला चांगली सुरुवात मिळाली होती. तो अनेक सामन्यांपासून आऊट ऑफ फॉर्म होता. त्यामुळे पुजाराकडून चांगल्या आणि मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो 53 धावांवर तंबूत परतला.
रहाणेसह शतकी भागीदारी
दरम्यान पुजारा आणि रहाणे या जोडीने 2 बाद 85 धावसंख्येपासून तिसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केली. रहाणे आणि पुजारा हे दोघेही अनुभवी खेळाडू आहेत. मात्र त्य दोघांची बॅट तळपली नव्हती. मात्र अखेर या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. इतकंच नाही तर दोघांनी अर्धशतकंही पूर्ण केली. मात्र अर्धशतकं पूर्ण केल्यानंतर दोघेही बाद झाले.
साऊथ आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्करम, कीगन पिटरसन, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, टेम्बा बावुमा, काइल व्हेरेने (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, कगिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर आणि लुंगी एनगिडी
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.