मुंबई : अनेक खेळाडू कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. असच टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहलीचा बेस्ट फ्रेंड ग्लेन मॅक्सवेलला देखील कोरोनाची लागण झाली आहे. ऑस्ट्रेलियाई ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेलची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. कोहली आणि मॅक्सवेल रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूच्या टीममधून एकत्र खेळतात.
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला बुधवारी सकाळी रॅपिड अँटीजेन चाचणीत कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ग्लेन मॅक्सवेलचा 2021 मध्ये आरसीबी संघात समावेश करण्यात आला होता. मॅक्सवेलचा टीममध्ये समावेळ झाल्याने आरसीबी टीम मजबूत झाली.
ग्लेन मॅक्सवेलने यापूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व केलं आहे. ग्लेन मॅक्सवेल हा बिग बॅश लीगमधील मेलबर्न स्टार्सचा कर्णधार आहे. मॅक्सवेलने या आयपीएल सीजनमध्ये आरसीबीसाठी 15 सामन्यांमध्ये 144.10 च्या स्ट्राइक रेटने 513 रन्स केले आहेत.
सोमवारी रेनेगेड्स विरुद्धच्या सामन्यानंतर ग्लेन मॅक्सवेलची तपासणी करण्यात आली. ग्लेन मॅक्सवेलची अजून एक चाचणी झाली आहे. या टेस्टचा अहवाल अजून आला नाही. तर आता टीममधील इतरांची देखील तपासणी केली जाणार आहे.
दरम्यान, बीबीएलमध्ये कोरोनाची प्रकरणं सातत्याने समोर येतातय. रेनेगेड्स टीममध्येही एकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. हा पाचवा क्लब आहे जिथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.