IND vs NZ : रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह क्रिकेट स्टेडियममध्ये आज न्यूझीलंड विरूद्ध भारत (IND vs NZ) यांच्यातील दुसरा सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने 8 विकेट्सने न्यूझीलंडवर मोठा विजय (team india beat new zealand) मिळवला आहे. नुकतंच टीम इंडियाने श्रीलंकेविरूद्ध मोठ्या विजयाची नोंद केली होती. 317 रन्सनी सामना जिंकत भारताने इतिहास रचला होता. तर आता अवघ्या 5 दिवसांत दुसऱ्या मोठ्या विजयाची नोंद केली आहे.
न्यूझीलंडविरूद्धचा दुसरा वनडे टीम इंडियाने 8 विकेट्सने जिंकला. या सामन्यासह भारताने सीरिज देखील खिशात घातली आहे. या सामन्यात रोहित शर्माची बॅट अखेर तळपली. कर्णधाराने ओपनिंगला उतरत अर्धशतक झळकावलं आणि टीमला विजय मिळवून दिला. अवघ्या 21 व्या ओव्हरमध्ये टीम इंडियाने हे लक्ष्य गाठलं आहे.
आजच्या सामन्यात रोहित शर्माने तुफान फलंदाजी केली. यावेळी त्याने 50 बॉल्समध्ये रन्सची खेळी केली. यामध्ये कर्णधाराने 7 फोर आणि 2 सिक्सेसचा समावेश आहे. तर शुभमन गिलने 53 बॉल्समध्ये 40 रन्सची खेळी केली. रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर विराट कोहली देखील मैदानात उतरला होता. मात्र अवघ्या 11 रन्सवर त्याला माघारी परतावं लागलं.
न्यूझीलंकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक म्हणजेच 36 रन्सची खेळी केली. गेल्या सामन्यात टीम इंडियासाठी मायकल ब्रेसवेलला देखील मोठी खेळी करता आली नाही. अवघ्या 22 रन्सवर तो माघारी परतला. फिलिप्सनंतर मिचेल सँटरने 27 रन्सची खेळी केली. या तिघांशिवाय कोणालाही दोन आकडी संख्या गाठता आली नाही. किवींचा संपूर्ण टीम 108 रन्सवर ऑल आऊट झाली. त्यामुळे टीम इंडियाने सहजतेने हे लक्ष्य पार केलं आहे.
टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक म्हणजेच 3 विकेट्स घेतले. तर हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी 2-2 विकेट्स घेतल्या आहे. तर मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादवला प्रत्येकी 1-1 विकेट काढण्यात यश आलं आहे.
भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
न्यूझीलंडचा संघ- फिन एलन, डेवोन कॉनवे, हेन्री निकोल्स, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार), ग्लेन फिलीप्स, मायकेल ब्रासवेल, मिशे सँटनर, हेन्री शिप्ले, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर