IND vs NZ 1st T20I : शुक्रवारी भारत विरूद्ध न्यूझीलंड (Ind vs NZ) यांच्यातील टी-20 सीरिजचा पहिला सामना खेळवण्यात आला. रांचीमध्ये हा सामना खेळण्यात आलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने यजमान टीम इंडियाचा दारूण पराभव केला आहे. हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया बॅकफूटवर गेल्याचं पहायला मिळतंय. मालिकेत न्यूझीलंडने 1-0 ने आघाडी मिळवली आहे. अशातच आता कॅप्टन हार्दिक पांड्याने (Captain Team India) पराभवाचं कारण सांगितलंय. (IND vs NZ 1st T20I Captain hardik Pandya says after the defeat by New Zealand latest sports news)
मी कधी विचारही केला नव्हता की, विकेट अशा प्रकारची असेल. हे पाहून दोन्ही संघ आश्चर्यचकित झालो, परंतु त्यांनी त्यावर चांगलं क्रिकेट खेळले आणि त्यामुळे निकाल त्याच्याबाजूने लागला. किंबहुना, नवीन चेंडू जुन्यापेक्षा जास्त टर्न घेत होता आणि ज्या पद्धतीने तो फिरत होता आणि उसळी घेत होता, त्याने आम्हाला आश्चर्यचकित केलं, असं हार्दिक पांड्या (Hardik Pandya) म्हणालाय.
That's that from Ranchi.
New Zealand win the first T20I by 21 runs in Ranchi.#TeamIndia will look to bounce back in the second #INDvNZ T20I.@mastercardindia pic.twitter.com/Lg8zmzwYVH
— BCCI (@BCCI) January 27, 2023
आम्ही मागे वळून पाहतो तेव्हा, मला वाटत नाही की, ही 177 धावांची खेळपट्टी होती. आम्ही चेंडूने 20-25 अतिरिक्त धावा दिल्या. ही यंग टीम आहे, आम्ही त्याच्यावर काम करू, असं हार्दिक पांड्या (Hardik Pandya on IND vs NZ 1st T20I) म्हणाला आहे.
आणखी वाचा - IND vs NZ : वॉशिंग्टन 'सुंदर' लढला पण भारत हरला, न्यूझीलंडचा 21 धावांनी विजय
दरम्यान, पहिल्या टी20 मध्ये न्यूझीलंडने भारतावर 21 धावांनी विजय मिळवला. मात्र, सुंदरने (Washington Sundar) सर्वांची मनं जिंकली आहे. हार्दिकने त्याचं कौतुक देखील केलंय. आम्हाला अशा व्यक्तीची गरज होती जी फलंदाजी आणि गोलंदाजी करू शकेल, तो आम्हाला खूप आत्मविश्वास देईल आणि तो आम्हाला पुढं जाण्यास मदत करेल. मात्र, या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडिया लखनऊमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या सामन्यात (IND vs NZ 2nd T20I) पुनरागमन करेल, असा विश्वास देखील त्याने व्यक्त केलाय.