अहमदाबाद: भारत विरुद्ध इंग्लंड आज पहिला टी 20 सामना अहमदाबाद इथे होत आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना संध्याकाळी 7 वाजता होत आहे. इंग्लंडला कसोटी सामन्यात हरवण्यात भारताला यश आलं असलं तरी आता टी 20 मध्ये भारताला पुन्हा मालिका जिंकण्याचं नवं आव्हान समोर असणार आहे.
कर्णधार विराट कोहलीनं संघात काही बदल केले आहेत. तर टी नटराजन संघात खेळणार की नाही याबाबत अद्याप शंका आहे. दुसरीकडे 7 वेगवेगळ्या पद्धतीनं बॉलिंग करणारा वरुण चक्रवर्ती फिटनेस टेस्टमध्ये नापास झाला. तर विराट कोहलीनं अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमारला संघात संधी दिली आहे.
भारतीय संघासाठी इंग्लडचे 5 खेळाडू खूप मोठी डोकेदुखी ठरू शकतात त्यांच्यामुळे मोठं आव्हान तर उभं राहिलंच मात्र मालिकेवर आपली पकड मजबूत करण्यासाठी थो़डं अवघड होऊ शकतं. इंग्लंड संघातील असे कोणते खेळाडू आहेत ज्यामुळे भारतीय संघासमोर तगडं आव्हान उभं राहिलं आहे जाणून घेऊया.
जोस बटलर हा विकेटकीपर आणि फलंदाज आहे. तो स्फोटक फलंदाजी करतो. टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डरमध्ये तो खेळेल असा अंदाज आहे. इंग्लंडनंतर त्याने आपल्या कारकीर्दीत सर्वाधिक सामने खेळले आहेत. इतकच नाही तर त्याच्याकडे IPLचा तगडा अनुभव आहे. त्याचा फायदा इंग्लंडला टी20 मालिकेसाठी उपयुक्त ठरणार आहे.
बेन स्टोक्सने तर चेन्नई आणि अहमदाबाद कसोटीमध्ये आपल्या तुफान फलंदाजीनं इंग्लंड संघ खेचला होता. ICC वर्ल्ड कपपासून ते आशियायी सीरिजपर्यंत त्याचा अनुभव खूप दमदार आहे. त्यामुळे त्याचा फायदा जसा पहिल्या कसोटीत झाला तसाच टी 20 साठी होऊ शकतो. त्यामुळे भारताची डोकेदुखी वाढू शकते.
33 वर्षांचा डेव्हिड मलान हा निवडक खेळाडूंपैकी एक आहे. ज्यामुळे भारताची डोकेदुखी वाढू शकते. त्याने 19 टी 20 सामने खेळले आहेत. मोईन खान आणि जोफ्रा आर्चर देखील इंग्लंड संघातील मशहूर खेळाडू असल्यानं भारतीय संघासाठी मोठा अडथळा निर्माण करू शकतात.