Video: मॅचनंतर बायकोने घेतली अश्विनची मजेशीर मुलाखत, शतकवीर अश्विन पत्नीच्या प्रश्नांसमोर क्लिन बोल्ड

IND VS BAN 1st Test R Ashwin Interview by Wife Prithi Video : भारत विरुद्ध बांगलादेश सामना झाल्यावर अश्विनची पत्नी प्रीति नारायण हिने पतीची मुलाखत घेतली.  यावेळी तिने अश्विनला अनेक प्रश्न विचारून गुगली टाकली. 

पुजा पवार | Updated: Sep 23, 2024, 06:35 PM IST
Video: मॅचनंतर बायकोने घेतली अश्विनची मजेशीर मुलाखत, शतकवीर अश्विन पत्नीच्या प्रश्नांसमोर क्लिन बोल्ड title=
(Photo Credit : Social Media)

IND VS BAN 1st Test Ravichandran Ashwin Interview by Wife Prithi Video : : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामान्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. चेन्नईत पार पडलेला पहिला टेस्ट सामना टीम इंडियाने जिंकला. रविवारी चौथ्या दिवशी टीम इंडियाने 280 धावांनी बांगलादेशवर विजय मिळवून सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली. आर अश्विन टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. अनुभवी गोलंदाज असलेल्या अश्विनने बांगलादेशच्या 6 विकेट्स घेतल्या तर 113 धावा करून शतक देखील ठोकले. यासाठी अश्विनला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार सुद्धा देण्यात आला. यावेळी आर अश्विनचे कुटुंब सुद्धा उपस्थित होते. सामना झाल्यावर अश्विनची पत्नी प्रीति नारायण हिने पतीची मुलाखत घेतली.  यावेळी तिने अश्विनला अनेक प्रश्न विचारून गुगली टाकली. 

मुलींना डॉटर्स-डे निमित्त काय गिफ्ट देणार : 

रविवारी डॉटर्स-डे होता तेव्हा पत्नी प्रीति नारायणन ने रविचंद्रन अश्विनला विचारले की तो डॉटर्स-डे निमित्त त्यांच्या मुलींना काय गिफ्ट देणार. आर अश्विनने यावर म्हंटले की, 'मी आपल्या मुलींना तो बॉल गिफ्ट करेन ज्याने मी आज बांगलादेश विरुद्ध ५ विकेट्स घेतल्या'. मग पत्नी प्रीतिने अश्विनला विचारले की माझ्या येण्याने तुझी एनर्जी वाढली का? यावर अश्विन म्हणाला, 'पहिल्या दिवशी मी तुला पाहिलं नाही अशी तुझी तक्रार आहे. सामन्यादरम्यान कुटुंबीयांना पाहणे खूप कठीण आहे. पण मी सामन्या दरम्यान प्रयत्न करतो, कारण मुली मला नेहमी विचारतात की तू आम्हाला हाय का नाही बोललास'.

हेही वाचा : 'या' भारतीय क्रिकेटर्सच्या मुलींची युनिक नाव माहितीयेत का?

पाहा व्हिडिओ : 

शतकाबाबत काय म्हणाला अश्विन? 

आर अश्विन याने पत्नीने घेतलेल्या मुलाखतीत सांगितले की त्याला सहा विकेट्स आणि शतकाची अपेक्षा नव्हती. तो म्हणाला, 'मला माहित नाही की यावर कोणती प्रतिक्रिया द्यावी. कारण पहिल्या दिवशी जे झालं ते खूप लवकर होतं. मला अजिबात अपेक्षा नव्हती की मी चेपॉकवर फलंदाजी करण्यासाठी येईन आणि शतक लगावेन कारण मी खूप वेळापासून फलंदाजी केली नव्हती.  प्रत्येक वेळी जेव्हा मी चेन्नईच्या चेपॉक मैदानावर येतो तेव्हा खूप विशेष वाटते. हे मैदान मला नेहमी पुढे जाण्याची प्रेरणा देते.