ICC Men’s Test Cricketer of the Year 2022,Ben Stokes: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने (ICC) 2022 साठीच्या क्रिकेट अवॉर्डची घोषणा केली आहे. यामध्ये आयसीसीने टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयरची निवड (ICC Men’s Test Cricketer of the Year 2022) केली. हा पुरस्कार अशा खेळाडूला मिळाला आहे. त्याने वेळोवेळी आयसीसीवर ताशेरे ओढले आहेत. मात्र, त्याच्या खेळ पाहून आयसीसीने ही मोठी घोषणा केली आहे. (ICC Awards England captain Ben Stokes wins ICC Men’s Test Cricketer of the Year 2022 award sports news)
यंदाचा आयसीसी मेन्स टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयरचा अवार्ड इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू बेन स्टोक्सला (Ben Stokes) मिळाला आहे. मागील वर्षी त्याने आपल्या अष्टपैलू कामगिरी आणि कॅप्टनसीच्या जोरावर इंग्लंडला नव्या उंचीवर पोहोचवलं होतं. इंग्लंडचा कर्णधार बनल्यानंतर बेन स्टोक्सने आतापर्यंत 10 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवलं असून त्यापैकी 9 सामने इंग्लंडने जिंकले आहेत.
Leading from the front
England's inspirational captain is the recipient of the ICC Men's Test Cricketer of the Year 2022 Award #ICCAwards
— ICC (@ICC) January 26, 2023
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका इंग्लंडने (England) जिंकली. तसेच टीम इंडियाला केवळ पुढं ढकलण्यात आलेल्या कसोटीत पराभूत करून मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली आणि पाकिस्तानला त्यांच्याच मैदानात 3-0 ने पराभूत केलं. त्यामुळे कॅप्टन म्हणून स्टोक्स (Captain Ben Stokes) चांगलाच प्रभावकारक ठरलाय.
आणखी वाचा - ICC ODI क्रिकेटर ऑफ द ईयरची घोषणा; ना रोहित ना विराट, 'या' खेळाडूने मारली बाजी!
दरम्यान, इंग्लंडचे प्लेयर्स आयसीसीच्या अनेक नियमांवर टीका करताना दिसतात. आयसीसीच्या सॉफ्ट सिग्लन नियमांवर बेन स्टोक्सने सडकून टीका केली होती. ICC Men’s Test Cricketer of the Year 2022 होण्याचा सन्मान स्टोक्सने मिळवलाच आहे. पण त्याचबरोबर आयसीसीने निवडलेल्या टेस्ट टीममध्ये (ICC Men's Test Team of the Year) देखील त्याला स्थान देण्यात आलंय.