कोलकत्ता : अंडर-17 फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये स्पेन आणि इंग्लंड या दोन युरोपियन जायंट्समध्ये फायनलचा मुकाबला रंगणार आहे.
कोलकत्ता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर आज रात्री आठ वाजता या सामन्याला सुरूवात होईल. स्पेन आणि इंग्लंड हे दोन्ही संघ वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी एकमेकांसाठी भिडतील.
स्पॅनिश टीम विजयासाठी फेव्हरिट असली तरी इंग्लंडची टीम त्यांना कडवी झुंज देण्यास सज्ज आहे. इंग्लडच्या टीमनं या टुर्नामेंटमध्ये एकही मॅच गमावलेली नाही. तर स्पेनला ब्राझिलकडून पराभव सहन करावा लागला होता. रियान ब्रेवस्टर या स्ट्रार स्ट्रायकरनं इंग्लंडसाठी या टुर्नामेंटमध्ये सात गोल केले आहेत.
आज अंतिम सामन्यामध्येही अनेकांच्या नजरा रियान ब्रेवस्टरवर खिळणार हे नक्की आहे. स्पॅनिश टीम मिडफिल्ड ओरिएंटेड फुटबॉल खेळते. त्यामुळे इंग्लिश टीमला स्पेनचा बचाव भेदण्याचं मोठ आव्हान असेल. जी टीम फायनलमध्ये सर्वोत्तम खेळ करेल त्याच टीमला वर्ल्ड चॅम्पियनची ट्रॉफी उंचावता येईल.