मुंबई: चार वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स संघाने नीरज चोप्राला खास गिफ्ट दिलं आहे. आनंद महिंद्रांपाठोपाठ CSK संघाने खास गिफ्ट दिल्याने आता चर्चा होत आहे. CSK संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या नीरज चोप्राचा सन्मान केला आहे. नीरज चोप्राच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे.
भालाफेकपटू नीरज चोप्रा याला चेन्नई सुपर किंग्ज संघाने क्रिकेट लिमिटेडच्या वतीने एक कोटी रुपयांचा चेक दिला. हा चेक देऊन नीरजने केलेल्या कामगिरीचं कौतुक करत त्याचा सन्मान केला आहे.
फ्रँचायझीच्या प्रसिद्धीपत्रकातून दिलेल्या माहितीनुसार, CSK ने त्यांच्या सन्मानार्थ जर्सी क्रमांक 8758 नीरज चोप्राला दिली आहे. या आकड्यामागे विशेष कारणही आहे. नीरजने 87.58 मीटर लांब भाला फेकून भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. चोप्राने अभिनव बिंद्रानंतर भारताला7 वर्षांनंतर वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून देणारा खेळाडू ठरला.
The one with the Golden boy @Neeraj_chopra1 ! Super happy to hand our to the arms that made us proud!
Read : https://t.co/qiiw18aLH6#WhistlePodu #Yellove pic.twitter.com/rMpHwWD2F7— Chennai Super Kings - Mask Pdu Whistle Pdu! (@ChennaiIPL) October 31, 2021
नीरजचा सन्मान याआधी आनंद महिंद्र यांनी गाडी देऊन केला. त्यापाठोपाठ चेन्नई संघाने देखील 1 कोटी रुपयांचा चेक देऊन सन्मान केला आहे. काशी विश्वनाथन, सीएसकेचे सीईओ म्हणाले की “नीरजच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देशाला त्याचा अभिमान आहे.
नीरज चोप्राने त्याच्या या केलेल्या विशेष सन्मानाबद्दल चेन्नई संघाचे विशेष आभार मानले आहेत. चेन्नई संघाने दिलेल्या जर्सीसोबतचा फोटो देखील सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.