मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने अंडर १९ विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या संघावर मात केल्यानंतर सर्वत्र या संघातीरल खेळाडूंचीच चर्चा सुरु आहे. कुठे संघातील खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे, तर कुठे त्यांच्या जिद्दीला आणि संघर्षाला सलाम करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या संघावर १० गडी राखत दणदणीत विजय मिळवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडू हे या सामन्यात विशेष लक्ष वेधून गेला.
सर्वच स्तरांतून या खेळाडूंचं कौतुक केलं गेलं. त्यातील एक नाव म्हणजे यशस्वी जैस्वाल. कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीने पाकिस्तानच्या खेळाडूंच्या नाकीनऊ आणले, तर भारताच्या सलामीच्या जोडीने या सामन्यावर सुरुवातीपासूनच वर्चस्व कायम ठेवलं.
समन्यामध्ये संघाच्या फलंदाजीच्या फळीला एका भक्कम स्थानावर आणणाऱ्या Yashasvi Jaiswals य़शस्वी जैस्वालने संयमी खेळी खेळत ११३ चेंडूंमध्ये १०५ धावा केल्या. त्याला यामध्ये साथ मिळाली ती म्हणजे दिव्यांश सक्सेनाची. ज्याने, ९९ चेंडूंमध्ये ५९ धावांची खेळी खेळली.
सामन्या यशस्वीची कामगिरी पाहता, खेळपट्टीवरील त्याच्या वाववरण्याचंही अनेकांनी कौतुक केलं. ज्यामध्ये माजी क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाला फलंदाजीच्या बाबतीत अनेकदा दणकेदार सुरुवात करुन देणाऱ्या वीरेंद्र सेहवागचाही समावेश आहे. सेहवागने नुकताच यशस्वीचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामधून परिस्थितीवर मात करत यशस्वीने कशा प्रकारे त्याच्या यशाची वाट निवडली हे पाहायला मिळत आहे.
मेहनत डॉट कॉम... असं लिहित त्याने यशस्वीचा त्याच्या पाणीपुरीच्या स्टॉलवरील एक फोटो आणि सामन्यात शतक झळकावल्यानंतरचा एक फोटो पोस्ट केला. रस्त्यावर पाणीपुरी विकणारा हा पठ्ठ्या एकेकाळी यातूनच मिळणाऱ्या पैशांवर त्याचा खर्च भागवत होता. पण, त्याची ही मेहनत अखेर त्याला खऱ्या अर्थाने फळ देऊन गेली आहे, असं म्हणायला हरकत नाही.