Virat Kohli आहे जगातील महागड्या वस्तूंचा मालक; जाणून घ्या घड्याळ, प्रायवेट जेटची किंमत

जगभरातील सर्वात महागड्या खेळाडूंमध्येही विराटच्या नावाचा समावेश आहे.   

Updated: Jul 5, 2021, 03:48 PM IST
Virat Kohli आहे जगातील महागड्या वस्तूंचा मालक; जाणून घ्या घड्याळ, प्रायवेट जेटची किंमत  title=
विराट कोहली

नवी दिल्ली : क्रिकेटचं मैदान गाजवणारा खेळाडू (Virat Kohli) विराट कोहली हा त्याच्या अनोख्या आणि तितक्या आकर्षक जीवनशैलीसाठी ओळखला जातो. जगातील अनेक महागड्या वस्तूंची मालकी विराटकडे आहे. जगभरातील सर्वात महागड्या खेळाडूंमध्येही विराटच्या नावाचा समावेश आहे. 

श्रीमंत खेळाडूंच्या यादीतही त्याच्या नावाचा समावेश आहे. फोर्ब्सच्या यादीत विराट कोहलीची वार्षिक कमाई 196 कोटी रुपये असल्याची नोंद केली आहे. महागड्या घड्याळांचं विराटला विशेष वेड आहे. सध्या तो हातात जे घड्याळ घालतो त्याची किंमत तब्बल 70 लाख रुपये इतकी आहे. सोनं आणि हिऱ्यांनी हे घड्याळ सजलं आहे. त्याच्याकडे विविध ब्रँडची घड्याळं असल्याचं म्हटलं जात आहे. 

फ्लाईंग स्पर कार

फायनेंन्शिअल एक्सप्रेसच्या मते विराट कोहलीकडे बेंटले फ्लाईंग कार आहे. या सेडान कारची किंमत 3.97 कोटी रुपये इतकी आहे. 

मुंबईत 34 कोटींचं घर

मुंबईत वरळी येथे विराटचं एक आलिशान घर आहे. 2016 मध्ये त्याने हे घर खरेदी केलं होतं. 7171 चौरस फुटांचं हे घर अनेकांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या घराची किंमत जवळपास 34 रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हरियाणामध्ये 80 कोटींचा बंगला 

विराट कोहलीकडे हरियाणामध्ये एक आलिशान बंगला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार या बंगल्याची किंमत 80 कोटी रुपये इतकी आहे. स्विमिंग पूल, जिम आणि इतरही सजावटीवर भर देण्यात आला आहे. 

प्रायवेट जेट 

विराटकडे तब्बल 125 कोटी रुपयांचं प्रायवेट जेट आहे. अनुष्कासोबत या जेटमधून विराट अनेकदा प्रवास करताना दिसतो. विराटकडे याहीपेक्षा अनेक महागड्या गोष्टी, वस्तू आहेत. त्याचा एकंदर अंदाज आणि राहणीमान पाहता विराट चर्चेत असल्यास हे कारणंही पुरेसंच ठरतं.