चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी 'या' स्टार खेळाडूने घेतली अचानक निवृत्ती, साधला बोर्डावर निशाणा; लिहिली भावनिक पोस्ट

Champions Trophy 2025: एकीकडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची चर्चा आहे तर दुसरीकडे निवृत्तीची शर्यत सुरू आहे. दरम्यान दिग्गज खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे.  

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 11, 2025, 07:12 AM IST
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी 'या' स्टार खेळाडूने घेतली अचानक निवृत्ती, साधला बोर्डावर निशाणा; लिहिली भावनिक पोस्ट title=

Tamim Iqbal Retirement: सगळीकडेच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची चर्चासुरु आहे. तर याच दरम्यान दुसरीकडे निवृत्तीची शर्यत सुरू आहे. एका पाठोपाठ एक खेळाडू आपल्या निवृत्तीची घोषणा करत आहे. आता बांगलादेशचा दिग्गज खेळाडू तमीम इक्बालने निवृत्तीची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असल्याबद्दल त्याने बांगलादेश क्रिकेट बोर्डावर (BCB) निशाणा साधला. त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. 

बोर्डवर साधला निशाणा

तमिम इक्बालने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, 'मी बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे आणि ते संपणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील माझा अध्याय आता बंद झाला आहे. मी काही काळापासून याचा विचार करत होतो आणि चॅम्पियन्स ट्रॉफी येत असताना, माझ्याबद्दलच्या चर्चेने संघाचे लक्ष विस्कळीत व्हावे असे मला वाटत नाही. या कारणास्तव मी नॅशनल कॉन्ट्रॅक्टपासून खूप आधी दूर झालो होतो. माध्यमांनी कधीकधी उलट सुचवले असले तरी.

इक्बाल बीसीबीसोबतच्या करारातून बाहेर

तो पुढे म्हणाला, ' 'मी बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे आणि तो संपणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील माझा अध्याय आता बंद झाला आहे. मी काही काळापासून याचा विचार करत होतो आणि चॅम्पियन्स ट्रॉफी येत असताना, माझ्याबद्दलच्या चर्चेने संघाचे लक्ष विस्कळीत व्हावे असे मला वाटत नाही. या कारणास्तव मी नॅशनल कॉन्ट्रॅक्टपासून खूप आधी दूर झालो होतो.'

बीसीबीसोबतच्या करारातून बाहेर पडला इक्बाल 

त्याने पुढे सांगितले की, 'जो व्यक्ती बीसीबीसोबत एका वर्षासाठी करारावर नाही. त्याच्यासाठी अशा चर्चेला काही अर्थ नाही. प्रत्येक क्रिकेटपटूला त्याचे भविष्य ठरवण्याचा अधिकार आहे आणि हे ठरवण्यासाठी मी माझा वेळ घेतला आहे. आता मला वाटते तो क्षण आला आहे. कर्णधार नझमुल हुसैन यांनी मला परत येण्याची मनापासून विनंती केली आणि मी निवड समितीशीही बोललो. मी कृतज्ञ आहे की त्यांना वाटते की मी अजूनही सक्षम आहे, परंतु मी माझ्या मनाचे ऐकले.'

२०२३ च्या विश्वचषकाचा उल्लेख केला

एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधून बाहेर पडल्यानंतरही इक्बालने मौन तोडले. तो म्हणाला, '2023 विश्वचषकापूर्वी संघातून बाहेर पडणे माझ्यासाठी धक्कादायक होते, क्रिकेटच्या कारणांमुळे नाही. तरीही, मी जिथे जिथे गेलो तिथे चाहत्यांनी मला पुन्हा राष्ट्रीय संघात पाहण्याची इच्छा व्यक्त केली आणि मी त्यांचे प्रेम आणि समर्थन यावर मनापासून विचार केला. माझ्या मुलाने मला थेट सांगितले नाही पण त्याने त्याच्या आईला सांगितले की त्याला मला राष्ट्रीय जर्सीमध्ये पाहायचे आहे. चाहत्यांची निराशा केल्याबद्दल मी दिलगीर आहे आणि मी माझ्या मुलाला सांगितले, तू मोठा झाल्यावर तुला तुझ्या वडिलांचा निर्णय समजेल.'