न्यूयॉर्क : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आपली गर्लफ्रेंड डॅनी विलिस हिच्यासोबत एंगेज झालाय. सोशल मीडियावरुन त्याने याची कबुली दिलीये.
स्मिथने डॅनीसोबतचा फोटो इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलाय. कायद्याची विद्यार्थीनी असलेली विलिस आणि स्मिथ गेल्या सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.
२८ वर्षीय स्मिथ आणि त्याची गर्लफ्रेंड विलिस सध्या अमेरिकेत सुट्ट्या एँजॉय करतायत. आज मी गुडघ्यावर बसून तिला प्रपोज केले आणि तिने(विलिस) होकार दिला. असं स्मिथने फोटो शेअर करताना म्हटलंय.
२६ वर्षीय विलिस सि़डनी युनिर्व्हसिटीमध्ये कॉमर्स/लॉचा एकत्रित पदवीचा अभ्यास करतेय. स्मिथ आणि विलिसची पहिली भेट २०११-१२मध्ये बिग ब२श लीगच्या पहिल्या सीजनमध्ये झाली होती.