Asia Cup 2023 : एशिया कपला ( Asia Cup 2023 ) सुरुवात झाली असून पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध नेपाळ आहे. तर सर्व चाहत्यांना उत्सुकता आहे ती, 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan ) सामन्याची. श्रीलंकेमध्ये हा हायव्होल्टेज सामना खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच चाहत्यांना एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. हा धक्का म्हणजे, 2 सप्टेंबर रोजी होणारा भारत-पाकिस्तान सामना रद्द होण्याची शक्यता आहे.
यंदाचा एशिया कप जिंकण्यासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदार मानली जातेय. या स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी ( India vs Pakistan ) रंगणार आहे. या सामन्याची प्रत्येक चाहत्याला उत्सुकता आहे, मात्र यापूर्वी चाहत्यांच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे.
भारत आणि पाकिस्तान ( India vs Pakistan ) सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं म्हटलं जातंय. जवळपास 10 महिन्यांनंतर जगभरातील क्रिकेट चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यातील हाय व्होल्टेज सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. परंतु पाऊस चाहत्यांची निराशा करण्याची शक्यता आहे.
Accu Weather च्या अहवालानुसार, शनिवारी म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कॅंडी शहरात पाऊस पडण्याची शक्यता आहे. 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कॅंडी शहरातील पल्लेकेले स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यात शानदार सामना रंगणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाची शक्यता असल्याने चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
World Weather Online ने 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेच्या कॅंडी शहरात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पावसाची बातमी चाहत्यांना निराश करू शकते. भारत आणि पाकिस्तानची ( India vs Pakistan ) टीम यापूर्वी 23 ऑक्टोबर 2022 रोजी T20 वर्ल्डकप 2022 च्या सामन्यात एकमेकांशी भिडल्या होत्या. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 4 विकेट्स राखून पराभव केला होता.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.