लंडन : वर्ल्ड कप संपल्यानंतर आता क्रिकेट रसिकांना ऍशेस सीरिजचे वेध लागले आहेत. दर २ वर्षांच्या अंतराने होणाऱ्या इंग्लंड-ऑस्ट्रेलिया या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील टेस्ट सामने पाहण्यासाठी क्रिकेट विश्व आतुरलेले असते. या ऍशेस सीरिजला येत्या १ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे या ऍशेजपासून खेळाडूंच्या जर्सीवर नाव आणि नंबर पाहायला मिळणार आहे.
याआधी वनडे आणि टी-२०मध्ये खेळाडूंच्या जर्सीवर त्यांची नावे आणि त्यांचा नंबर असायचा. पण ऍशेस सीरिजमध्ये पहिल्यांदाच क्रिकेट रसिकांना खेळाडूंच्या जर्सीवर नाव आणि नंबर पाहायला मिळणार आहे.
टेस्टच्या जर्सीवरील नाव आणि नंबर यावरुव क्रिकेट वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही क्रिकेटप्रेमींनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तर काहींनुसार या निर्णयाला काहीच अर्थ नाही. या निर्णयामुळे आपल्या आवडत्या खेळाडूला त्याच्या जर्सीवरुन ओळखता येणार आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन जो रुटचा एक फोटो शेअर केला आहे. जो रुटच्या जर्सीवर ६६ नंबर दिसत आहे.
Names and numbers on the back of Test shirts!pic.twitter.com/M660T2EI4Z
— England Cricket (@englandcricket) July 22, 2019
यंदाच्या ऍशेस सीरिजचं आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आलं आहे. त्यामुळे इंग्लंडला आपल्या अनुकूल परिस्थितीचा फायदा मिळू शकतो. गेल्या वेळेस इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाने आपल्या भूमीत ०-४ ने पराभूत केले होते. त्या वेळेस एशॅससाठी बेन स्टोक्सची निवड न केल्याने इंग्लंडला मोठा फटका बसला होता.