मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 19 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने कोलकातावर 44 धावांनी विजय मिळवला. दिल्लीने कोलकाताला विजयासाठी दिलेल्या 216 धावांचे आव्हान दिले. मात्र कोलकाताची टीम 19.4 ओव्हरमध्ये 171 धावांवर ऑलआऊट झाली. दरम्यान या सामन्यातंही केकेआरचा ओपनर आणि मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे फेल झाला आहे.
मुळात वेळा जीवनदान मिळूनही रहाणेला केवळ 8 रन्सचा खेळ करता आला. 216 रन्सचं लक्ष्य गाठण्यासाठी कर्णधार श्रेयस अय्यरने 54 धावा केल्या, पण टीमला विजय मिळवण्यासाठी ते पुरेसं नव्हतं. अशा परिस्थितीत हळू खेळणारा अजिंक्य रहाणे सोशल मीडियावर ट्रोलच्या निशाण्यावर आला आहे.
यावेळी युझर्सने त्याला, चांगला स्ट्राईक रेट असं म्हणत डिवचंल आहे. या स्ट्रईट रेटमुळे तू नक्कीच इंडियन टीममध्ये येऊ शकतो, असं सांगत त्याला ट्रोल केलंय. तर अजून एका युझरने 130 रन्सचं लक्ष्य असताना अजिंक्य रहाणेला टीममध्ये घ्या असं म्हटलंय. तर काहींनी त्याला आता क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा सल्ला दिला.
Nice strike rate for #Rahane, he'll surely comeback to the Indian Test Team soon pic.twitter.com/157HKwYKyM
— Siddharth(@SiddhuYour) April 10, 2022
KKHAAR wont make it to play offs if they play Rahane. Rahane is good when you have to chase 130. Anything more than that is not possible for him.
— Suddhyashil Sarkar (@Authentic007007) April 10, 2022
Ajinkya Rahane #IPL2022:
M-5 , Runs-80 ,Avg-16 ,SR-100#ThankYouRahane
You will be missed,thanks for the wonderful memories pic.twitter.com/ZLbMajQT7N— (@DanielSamsDolan) April 10, 2022
कोलकाताचा ओपनर आणि लोकल बॉय अजिंक्य रहाणे पहिल्याच ओव्हरमध्ये एक नाही, दोन नाही, तर तब्बल 3 वेळा आऊट झाला. मात्र यानंतरही रहाणे खेळत राहिला. यामध्ये दोन वेळा डीआरएसमुळे रहाणे वाचला आणि तिसऱ्या वेळी दिल्लीने अपीलच केलं नसल्याने रहाणे खेळत राहिला. मात्र रहाणेला या संधीचं सोनं करता आलं नाही. रहाणेने 14 बॉलमध्ये 1 फोरसह 8 धावा केल्या.