अशी 'ती' एक घटना घडली की त्याचं उत्तर अजूनही कपिल देव यांना मिळालं नाही

'तो' वर्ल्ड कपचा सामना जिंकल्यानंतरही अजून या प्रश्नचं उत्तर मिळालं नाही...  

Updated: Dec 25, 2021, 09:56 PM IST
अशी 'ती' एक घटना घडली की त्याचं उत्तर अजूनही कपिल देव यांना मिळालं नाही title=

मुंबई: 83 सिनेमाच्या निमित्ताने 1983 च्या वर्ल्ड कपचे किस्से आणि आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. 83 सिनेमा जेवढा चाहत्यांना खळखळून हसवणारा आहे तेवढाच भावुक करणारा आहे. 1983 मधील एक घटना तर अशी आहे ज्याचं उत्तर आजही कपिल देव शोधत आहेत. 

1983 रोजी टीम इंडियाने वेस्टइंडिजला पराभूत करून ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाचा उत्साह आणि आनंद एवढा मोठा होता की क्रिकेटपटू आपली भूकही विसरले होते. रात्री उशिरापर्यंत याचा आनंद साजरा होत होता.

या आनंदात कपिल देव यांच्यासोबत इतर क्रिकेटपटूंनी शॅम्पैनच्या अनेक बाटल्या फोडल्या. कपिल देव शॅम्पैन घेत नव्हते. मात्र या विजयाच्या आनंदात त्यांच्यासह बाकी खेळाडूंनी आनंद साजरा करत शॅम्पैनच्या बाटल्या फोडल्या. 

खेळाडूंच्या खिशात तर फार पैसेही नव्हते. त्याकाळी जेमतेम त्यांना जिंकल्यानंतर 200 रुपये मिळायचे. मात्र हा विजय साजरा केला तेव्हा खिसा रिकामा होता. अशा परिस्थितीमध्ये एवढ्या फोडलेल्या शॅम्पैनचं बिल कोणी भरलं याचं उत्तर आज तागायत कपिल देव यांना मिळालं नाही. 

त्या शॅम्पैनचं बिल कोणी भरलं असावं हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. याचं उत्तर कपिल देव शोधत आहेत. 83 चा वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाने जगाला दाखवून दिलं की आम्हीही कमी नाही. ऐतिहासिक विजय हा सर्वांच्याच लक्षात राहणारा आहे. यावरच आधारीत 83 हा सिनेमा आहे. जो सध्या बॉक्स ऑफिसवर सर्वात जास्त हिट ठरला आहे.