नवी दिल्ली : नॅशनल टी-20 कपमध्ये बलुचिस्तान संघाचे चार खेळाडू कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) 6 ऑक्टोबर रोजी यासंदर्भात माहिती दिली आहे. या खेळाडूंची नावं अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूंना दहा दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे.
पीसीबीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, “इतर सर्व खेळाडूंची चाचणी निगेटिव्ह आली आहे. चाचणी निगेटीव्ह आलेले सर्व खेळाडू या स्पर्धेत खेळत राहतील. सर्व खेळाडू तसंच त्यांच्या कुटुंबीयांचीही मंगळवारी चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीमध्ये सर्व निगेटिव्ह आढळून आले आहेत.
पीसीबीने सांगितलं की, 6 ऑक्टोबरला त्यांचा सामना आता 9 ऑक्टोबरला खेळला जाईल. रिलीझमध्ये पुढे म्हटलंय की, 7 ऑक्टोबर रोजी होणारा सामना त्यांच्या वेळेनुसार होईल, त्यात कोणतेही बदल केले जाणार नाहीत. क्रिकेट असोसिएशन चॅम्पियनशिपच्या 3 दिवसीय स्पर्धेतून बलुचिस्तान आपल्या खेळाडूंना भरपाई देईल.
लागण झालेल्या खेळाडूंना एका बबलमधून दुसऱ्या बबलमध्ये ट्रान्सफर केलं जाईल आणि बदली म्हणून आलेल्या खेळाडूंना कोविड -19 च्या प्रोटोकॉलनुसार कोरोना चाचणी करून घ्यावी लागणार आहे.
बलुचिस्तानने या हंगामात 6 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. ही टीम पाचव्या स्थानावर आहे. मध्य पंजाब 7 सामन्यांत 5 विजयांसह प्रथम असून खैबर पख्तूनवा 4 विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे.