Surya Grahan 2023 Sutak Kaal: यंदाच्या वर्षीचं पहिलं सूर्यग्रहण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं आहे. 20 एप्रिल म्हणजेच गुरुवारी हे सूर्य ग्रहण होणार असून सकाळी 7 वाजून 04 मिनिटं ते दुपारी 12 वाजून 29 मिनिटांपर्यंत राहणार आहे. मुळात ग्रहण या शब्दानेच अनेकांच्या मनात भीती दाटून येते. कारण ग्रहणाचा प्रभाव हा जवळपास सर्व राशींवर पडताना दिसतो.
गुरुवारी सकाळी होणारं सूर्यग्रहण हे यंदाच्या वर्षीचं पहिलं ग्रहण आहे. वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येच्या दिवशी हे ग्रहण होणार आहे. सामान्यपणे, ग्रहण ज्या भागात होतं त्याचा परिणाम तिथल रहिवाशांवर होतो. मात्र हे खंडग्रास ग्रहण असून भारतात दिसून येणार नाहीये. त्यामुळे भारतातील लोकांवर याचा परिणाम पडणार नाही.
भारतात हे ग्रहण दिसणार नसल्याने त्याचा सुतक कालावधी देखील वैध राहणार नाहीये. सूर्य ग्रहणाचा सुतक कालावधी 12 तास आधीपासून सुरू होतो. तर चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी 9 तास आधीपासून सुरू होतो. मात्र ग्रहणाच्या प्रभावाप्रमाणे सूतक काळ देखील मानला जाणार नाही.
आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्य ग्रहणाबाबत फार मान्यता आहेत. सूर्यग्रहणाच्या काळात या किरणांमुळे अन्न दूषित होतं असल्याचं मानलं जातं. हे अन्न खाल्याने एखादा व्यक्ती आजारीही पडू शकतो, असं मानलं जातं. याशिवाय या काळात शुभ कार्य किंवा पूजा करण्यास मनाई असल्याचं मानलं जातं. ग्रहण संपल्यानंतर सुतक कालावधी आपोआप संपतो.
वैदिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे, ग्रहण हे नेहमी मेष आणि अश्विनी नक्षत्रात होतं. मात्र यावेळी 19 वर्षांनी सूर्यग्रहण हे मेष राशीत होणार आहे. विज्ञानाच्या दृष्टीकोनातून ग्रहण ही सकारात्मक घडामोडीचं प्रतिक मानलं जातं. ग्रहणाबाबत ज्योतिषशास्त्रात आणि वैज्ञानिकदृष्टीकोनातून वेगवेगळी मान्यता आहे. तर दुसरीकडे धार्मिक दृष्टिकोनातून सूर्यग्रहण हे अशुभ मानलं जातं.
चीन, अमेरिका, मायक्रोनेशिया, न्यूझीलंड, व्हिएतनाम, तैवान, पापुआ न्यू गिनी, इंडोनेशिया, फिलीपिन्स, मलेशिया, फिजी, जपान, सामोआ, सोलोमन, सिंगापूर, थायलंड, कंबोडिया, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया याठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे.