Shani Margi In October 2022: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी बदल करतो. प्रत्येक ग्रहाच्या राशी बदलाचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर दिसून येतो. 12 जुलै रोजी शनिने वक्री होत कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश केला आहे. या काळात शनिची साडेसाती आणि अडीचकीमुळे प्रभावित झालेल्या राशींना शनि वक्री होताच आराम मिळाला आहे. इतर राशी शनिच्या नियंत्रणाखाली आल्या आहेत. शनि हा अतिशय संथ गतीने मार्गक्रमण करणारा ग्रह आहे आणि त्यामुळेच कोणत्याही राशीवर शनिचा प्रभाव दीर्घकाळ राहतो. 12 जुलैलाच शनि वक्री म्हणजेच उलट दिशेने मार्गस्थ झाला आहे. शनि ग्रहाने कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश केला आहे. आता शनि येथून कधी मार्गस्थ होणार हे जाणून घेऊया.
पंचागानुसार, 5 जून 2022 रोजी शनि कुंभ राशीतून वक्री झाले होते. या अवस्थेत 12 जुलै 2022 रोजी मकर राशीत प्रवेश केला आहे. या राशीत शनि 141 दिवस राहील. 5 जून ते 22 ऑक्टोबरपर्यंत शनि वक्री स्थितीत राहील. 23 ऑक्टोबरला शनि मार्गस्थ होईल. या दिवशी ज्या राशीच्या लोकांचा शनि अशुभ फल देत आहे, त्यांना शनि मार्गस्थ होताच आराम मिळेल. ज्यांना 5 जून रोजी शनिच्या अशुभ परिणामापासून दिलासा मिळाला आहे. ते पुन्हा एकदा शनिच्या प्रभावाखाली येतील.
12 जुलै रोजी मकर राशीत प्रवेश केल्यानंतर 6 महिने या राशीत राहतील. 23 ऑक्टोबर रोजी मार्गी अवस्थेत आल्यानंतर 17 जानेवारी 2023 रोजी शनि पुन्हा कुंभ राशीत प्रवेश करेल. तेव्हा मकर, कुंभ आणि मीन राशीला साडेसाती सुरु होईल. तर कर्क आणि वृश्चिक राशीला अडीचकी सुरु होईल. या काळात जे लोक शनीच्या नियंत्रणाखाली येतील त्यांनी शनिचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी हे उपाय करावेत.
शनिदेवांचे कृपा मिळवण्याचे उपाय
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)