Shani Asta : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कर्मदाता आणि न्यायदेवता मूळ त्रिकोण राशीत म्हणजे कुंभ राशीत विराजमान आहे. याठिकाणी त्याची हालचाल होत असते. तब्बल 30 वर्षांनंतर शनिदेव कुंभ राशीत अस्त झाला आहे. ज्यामुळे राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक बदल होणार आहेत. काही राशींना शनीच्या चालीतील बदलामुळे सावध राहावं लागणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हणतात की, शनिदेव जाचकाला कर्माची फळ देतो. शनिदेव दयाळू असला तरी तो पापी आणि क्रूर ग्रह मानला जातो. त्यामुळे 30 वर्षांनंतर कुंभ राशीत शनीच्या अस्तामुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे तर कोणासाठी तो घातक ठरणार आहे जाणून घेऊयात. (Shani Asta in Aquarius after 30 years saturn will Auspicious zodiac signs get money and Shani Asta on zodiac signs bad condition )
या राशीच्या लोकांना शनि अस्त झाल्यावर लाभ होणार आहे. तुमच्या बॉस आणि सहकाऱ्यांच्या पाठिंब्याने तुम्ही तुमच्या करिअरमधील सर्व कामं चांगल्या प्रकारे पूर्ण करणार आहात. आर्थिक समस्या हळूहळू नष्ट होणार आहे. आपल्या आरोग्याची काळजी मिटणार आहे. परदेश प्रवासाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या राशीच्या लोकांना 2024 मध्ये शनि अस्तामुळे खूप लकी ठरणार आहे. या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. स्पर्धेची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळणार आहे. घरात सुख-शांतीचे वातावरण असणार आहे. मित्राच्या मदतीने जीवनातील अडचणी दूर होणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी शनीची अस्त शुभ परिणाम दिसून येणार आहे. या राशीच्या लोकांसाठी वर्षानुवर्षे रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. घरात आणि जीवनात सुख-शांतीचं वातावरण असणार आहे. शनीच्या शुभ प्रभावामुळे करिअरमध्ये पदोन्नती होणार आहे.
या राशीच्या लोकांनो शनीची अस्त अशुभ परिणाम भोगावे लागणार आहे. आर्थिक जीवनात चढ-उतार पाहावे लागणार आहे. जीवनात तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. कामं पूर्ण होण्यात अडथळे होणार आहेत. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या अन्यथा हॉस्पिटलच्या पायऱ्या चढाव्या लागतील.
या राशीच्या लोकांसाठी शनीची स्थिती हानीकारक ठरणार आहे. आर्थिक स्थितीत बदल होणार असून पैशांची चणचण भासणार आहे. आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे तुम्ही नकारात्मक विचाराने वेढले असणार आहात. तुमच्या जोडीदारासोबत वादाची परिस्थिती निर्माण होणार आहे. तब्येतही बिघडण्याची शक्यता आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)