Paush Amavasya 2024 : नवीन वर्षांतील पहिल अमावस्या पौष अमावस्या म्हणून ओळखली जाते. पंचांगानुसार ही अमावस्या गुरुवार 11 जानेवारीला संध्याकाळी 5.30 वाजेपासून सुरु होणार असून 12 जानेवारीला दुपारी 2.25 पर्यंत असणार आहे. अमावस्येला स्नान करून पितरांसाठी तर्पण, पिंड दान, श्राद्ध करणे शुभ मानले जाते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ही अमावस्या काही राशींसाठी शुभ असणार आहे. (Paush Amavasya 2024 will be lucky for the people of these zodiac signs You will get position and unlimited money)
पौष अमावस्या तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. वैवाहिक जीवन आनंदी असणार आहे. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ आनंदाने व्यतित करणार आहात. जे अजूनही अविवाहित आहेत ते एखाद्याच्या प्रेमात पडण्याची शक्यता आहे. तुमचा मान-सन्मान वाढणार आहे. धार्मिक कार्यात तुमची आवड निर्माण होणार आहे.
पौष अमावस्या कर्क राशीच्या लोकांवर नशीब मेहरबान असणार आहे. तुम्ही कोणतेही काम कराल, त्यात तुम्हाला घवघवीत यश मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या मातृपक्षाकडून आर्थिक लाभ मिळणार आहे. अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल असणार आहे. तुम्हाला बॉस आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभणार आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवण्यात यश मिळेल.
पौष अमावास्या तुमच्या राशीसाठी आरोग्यासाठी उत्तम असणार आहे. तुमचं मन धार्मिक कार्यात गुंतणार आहे. तुमची एखादी खास व्यक्ती भेटल्यामुळे तुम्ही आनंदी असणार आहात. या दिवशी काही नवीन करायचं असेल तर वेळ अनुकूल असणार आहे.
पौष अमावस्या तुम्हाला नशिबाची साथ देणार आहे. या दिवशी केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यात मोठा आर्थिक लाभ देणार आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी हा दिवस उत्तम असणार आहे. परदेशातून काही चांगली बातमी कानाव पडणार आहे. कौटुंबिक जीवन आनंदी असणार आहे. धार्मिक सहलीचे योग जुळून आले आहेत.
पौष अमावास्या तुमच्या नोकरी आणि व्यवसायासाठी खूप शुभ ठरणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नफा कमावण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतित करणार आहात. विवाहित लोकांना त्यांच्या मुलांकडून चांगली बातमी कळणार आहे. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)