Basant Panchami 2024 : यंदाची वसंत पंचमी अतिशय आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या संयोगातून पंच दिव्य योगाची निर्मिती होत आहे. 12 फेब्रुवारीला शनिची रास मकर शुक्रदेव गोचर करणार आहे. मकर राशीत आधीपासून बुध ग्रह विराजमान आहे. यात मंगळ ग्रहही मकर राशीत असणार आहे. त्यामुळे मकर राशीत त्रिग्रही निर्माण होणार आहे. तसंच मेष राशीत चंद्र आणि गुरुच्या संयोगातून गजकेसरी योग तर मकर राशीतच मंगळ आणि शुक्राच्या भेटीतून धनशक्ती राजयोग तयार होत आहे. सोबतच शुक्र आणि बुध यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण राजयोगची 12 फेब्रुवारीपासून निर्मिती होणार आहे. उच्च राशीत मकरमध्ये मंगळची उपस्थिती रुचक योग जो पंचमहापुरुष योगांपैकी एक आहे. असा ग्रहांमुळे तयार झालेले राजयोग वसंत पंचमीला जुळून येणार आहे. वसंत पंचमी ही 14 फेब्रुवारीला असणार आहे. हे योग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. (Panch Divya Yoga with Lakshmi Narayan on Basant Panchami 2024 Blessings of Goddess Lakshmi will shower on the people of this zodiac sign)
या राशीच्या लोकांसाठी दिव्य पंच योग खूप फायदेशीर सिद्ध होणार आहे. या राशीच्या लोकांची प्रदीर्घ प्रलंबित कामं मार्गी लागणार आहे. यासोबतच संपत्तीच्या वाढीसोबत बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होणार आहात. यासोबतच तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य लाभणार आहे. नोकरीत पदोन्नती किंवा मूल्यमापना होणार असल्याने तुम्ही आनंदी असणार आहात.
या राशीच्या लोकांसाठी हा महायो वरदान ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य लाभणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी यश संपादन करण्यात यशस्वी होणार आहेत. व्यवसायातही भरपूर नफा मिळणार आहे. व्यवसायात एखादा मोठा प्रकल्प किंवा करार होणार आहे. यातून तुम्हाला भरपूर पैसे कमावण्याची संधी लाभणार आहे. वैवाहिक जीवनातही आनंद आनंद राहणार आहे. यासोबतच देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी दिव्य पंच योग खूप फायदेशीर सिद्ध होणार आहे. या राशीचे लोक त्यांच्या करिअरमध्ये खूप आनंदी असणार आहेत. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहे. यासोबतच तुमची मेहनत आणि समर्पण पाहून उच्च अधिकारी तुमच्यावर खुश होणार आहेत. तुमच्या बोलण्याने तुम्ही सर्वांचे आवडते बनणार आहात. तुम्हाला वरिष्ठ लोकांसह पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळणार आहे. जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढणार आहे. यासोबतच दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामं मार्गी लागणार आहे. संपत्तीत वाढ होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)