Lakshmi Narayan Yog: नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघा एक महिना बाकी आहे. वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, आगामी नवीन वर्ष काही राशींसाठी फार लकी असणार आहे. वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर असतो ज्यामध्ये अनेक ग्रह त्यांच्या राशी बदलत असतात. या ग्रहांच्या बदलांमुळे अनेक प्रकारचे शुभ आणि अशुभ योग तयार होत आहेत.
यावेळी डिसेंबर महिन्यात वर्षाच्या शेवटी लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. हा योग अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणू शकणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना या योगाचा भरपूर लाभ मिळू शकणार आहे. जाणून घेऊया लक्ष्मी नारायण योगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार 28 डिसेंबरला बुध वृश्चिक राशीत वक्री अवस्थेत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी शुक्र आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत दोन्ही ग्रहांचा संयोग होणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग फायदेशीर ठरू शकणार आहे. हा योग वृश्चिक राशीच्या घरात तयार होणार आहे. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुम्ही बचत करण्यातही यशस्वी होऊ शकता. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो.
लक्ष्मी नारायण योगाच्या निर्मितीमुळे या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात. तुमच्या कामात येणारे अडथळे दूर होऊ शकतात. व्यावसायिक जीवनातील गोंधळही थोडा कमी होऊ शकतो. या कालावधीत तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकता. जीवनात फक्त आनंद आणि समृद्धी असेल. नवं काम या कालावधीत करणे फायदेशीर ठरू शकते.
लक्ष्मी नारायण योग या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात नवीन व्यवसाय सुरू करणे चांगले सिद्ध होऊ शकते. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येणार आहे. मात्र त्यावर तुम्ही सहज मात करा. तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. लक्ष्मी नारायण योग तयार केल्याने देवी लक्ष्मीचा अपार आशीर्वाद प्राप्त होतो. यावेळी नशीब तुम्हाला साथ देईल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )