मेष - समस्या सोडवल्या जाऊ शकतात. आधी केलेल्या गुंतवणूकीचा फायदा होऊ शकतो. पैसे गुंतवणूकीवेळी इतरांशी बोलून निर्णय घ्या. कोणतीही संधी घालवू नका. दिवस चांगला जाईल. नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. नोकरी, व्यवसायात बदल करण्याचा विचार करु शकता.
वृषभ - स्वत:वर विश्वास ठेवा. मेहनत करा. माहिती गोळा करा. लोकांशी बोला, गरज पडल्यास प्रवासही करा. तुमच्या जीवनात काही बदल होऊ शकतात. नवीन अनुभव मिळतील. जुन्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करा. प्रसन्न मनाने इतरांचं बोलणं ऐकून काम कराल.
मिथुन - नवीन प्रयोग करु शकता. आत्मविश्वास वाढेल. मनाचं ऐका. सर्व प्रकारच्या संबंधांमध्ये सहजता राहील. लोकांशी तुमचा ताळमेळ राहील. कुटुंबिय किंवा मित्रांसोबत योजना आखू शकता. जोडीदारासोबत वेळ घालवू शकता.
कर्क - प्रयत्न केल्यास, यश मिळेल. कोणालाही तुमच्या मताशी सहमत करु शकता. घरात काही गोष्टी अचानक तुमच्यासमोर येऊ शकतात. काही वेळ एकट्यात घालवल्यास फायदा होऊ शकतो. ऑफिसमध्ये तडजोड करावी लागू शकते, मात्र येणाऱ्या दिवसांत याचा फायदा होऊ शकतो.
सिंह - चांगल्या संधी मिळतील. नवीन योजनांबद्दल निर्णय घेऊ शकता. नोकरीत नवी जबाबदारी मिळू शकते. धनलाभाची शक्यता आहे. दुसऱ्यांच्या बोलण्याकडेही लक्ष द्या. प्रवास होऊ शकतो.
कन्या - नोकरीत यश मिळेल. नोकरीत कामाचं कौतुक होईल. भेटवस्तू मिळू शकते. नवीन मित्रांशी ओळखी होऊ शकतात. काळजी करु नका.
तुळ - योग्य योजना आणि विचारपूर्वक निर्णय घेतल्यास मोठा फायदा होऊ शकतो. विचार केलेली कामं पूर्ण होऊ शकतात. नोकरीत बदल करण्याचा विचार करु शकता. तुमच्या विचारांनी इतरांना प्रभावित करु शकता. धनलाभाची शक्यता आहे.
वृश्चिक - ऑफिसमध्ये नवी जबाबदारी मिळू शकते. सकारात्मक राहा. काम जास्त नसेल, परंतु दिवस वेगाने जाईल. चांगल्या लोकांशी झालेली ओळख फायद्याची ठरेल.
धनु - पैशांच्या बाबतीत समजूतीने विचार करा. जोडीदाराचा सल्ला फायद्याचा ठरेल. पैसे कमवण्यासाठी योजना आखा. मित्रांची भेट होऊ शकते. डोक्यात सतत काहीतरी विचार सुरु राहतील. नवीन संधी मिळू शकतात.
मकर - अनेक दिवसांपासून केलेली मेहनत फायद्याची ठरेल. विचार केलेली कामं पूर्ण कराल. कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. जवळच्यांचं तुमच्याकडे लक्ष असेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल.
कुंभ - काही बदलांची सुरुवात आज होऊ शकते. इतरांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकता. सकारात्मक राहा.
मीन - तुमचं काम पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत कराल. व्यस्त राहाल. दिवस चांगला जाईल. पैशांच्या बाबतीत दिवस चांगला आहे. अनेक लोक तुमच्याबाबतीत सकारात्मक असतील. कुटुंबातील लोकांची मदत होईल. धनलाभाची शक्यता आहे. मुलांच्या बाबतीत समस्या असल्यास दूर होतील.