Holika Dahan 2023 Date in Maharashtra: मार्च महिन्याची चाहुल लागल्यावर सगळ्यांना वेध लागतात ते होळीचे...कोकवासीयांसाठी तर शिमग्या...मुंबईतील चाकरमान्यांना वेध लागतात ते कोकणाचे...रंगांची उधळण करणारा आणि नकारात्मक गोष्टींचं दहन करणारा हा सण...होळी म्हटलं की आठवण येते ती गरमा गरम पुरण पोळी त्यावर तुपाची धार...सुटलं ना तोंडाला पाणी...मग कधी आहे होलिका दहन...आणि या वर्षी होलिका दहनावर भद्राची सावली असणार की नाही? होलिका दहन हा फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला उत्सव केला जातो. होलिका दहनाच्या दिवशी भद्राकाल पाळला जातो. त्यामुळे या सगळ्याविषयी जाणून घेऊयात. (Holika Dahan 2023 Date Time shubh muhurta holashtak 27 February Bhadrakal holi puja vidhi in marathi)
हिंदू पंचागनुसार यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी ही 6 मार्च 2023 ला संध्याकाळी 4.17 ते 7 मार्च 2023 ते संध्याकाळी 6.09 पर्यंत असणार आहे. तर उदयतिथीनुसार आपल्याला होलिका दहन हा सण 6 मार्च 2023 करायचा आहे. हिंदू रीतीरिवाजनुसार भद्रा मुख आणि भद्रापुच्छ या काळात होलिका दहन करायचं असतं.
हिंदू धर्मानुसार आणि पौराणिकेत उल्लेखानुसार भद्रा काळात होळी पेटवणं हे अशुभ मानलं जातं. असं म्हणतात की यमराज हा भद्राचा स्वामी आहे. त्यामुळे भद्रा काळात कुठलही शुभ कार्य करायला नको असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र सोडलं तर उत्तरेकडील शहरात फाल्गुन महिना सुरु होताच होळीला सुरुवात होते. पंचांग नुसार होलाष्टक सोमवारी 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. शास्त्रानुसार या काळात कुठलही शुभ कार्य केलं जातं नाही.
6 मार्च 2023 - संध्याकाळी 4.48 पासून 7 मार्च 2023 ला पहाटे 5.14 पर्यंत
पंजाब, महाराष्ट्र, जम्मू, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये 6 मार्चला होलिका दहन केला जाईल. तर पूर्व भारतात 7 मार्च ला पौर्णिमा तिथी असणार आहे. त्यामुळे पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये 7 मार्चला होलिका दहन आणि 8 मार्चला रंगोत्सव साजरा केला जाईल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)