Which Flower Is Offered To God: काबाडकष्ट करूनही घरात आर्थिक चणचण दिसून येते. घरात वेगळ्या प्रकारचे नकारात्मक वातावरण पाहायला मिळते. पैसा मिळवण्यासाठी केवळ मेहनतच नाही तर नशीबही चांगले असले पाहिजे, असे मानले जाते. देवी-देवतांचा आशीर्वाद मिळाल्यावरच नशिबाची प्राप्ती होते. देव हा भक्तीचा भुकेला असतो. विविध रंगांची फुले सर्व देवी-देवतांना प्रिय असतात. जर तुम्ही त्यांना त्यांचे आवडते फूल अर्पण केले तर त्यांची कृपा तुमच्यावर सदैव राहील. चाफ्याच्या कळी व्यतिरिक्त कोणत्याही फुलाची कळी देवाला अर्पण करू नये. कोणत्या देवाला कोणती फुले प्रिय आहेत, जाणून घेऊयात
आराध्य दैवत गणपतीला तांबडी फुले, जास्वंदाचं फुल वाहली जातात. यामुळे गणपतीचा कृपा आशीर्वाद राहतो. गणपतीला दुर्वा व लाल रंगाची फुले आवडतात असे सांगितले जाते.
शनिदेवाला न्यायाची देवता म्हणतात. ज्यांच्यावर शनिदेवाची कृपा असते, त्यांच्या घरात सुखाची कमतरता नसते. शनिदेवाला निळी फुले अधिक प्रिय आहेत. पूजेच्या वेळी निळे फुले अर्पण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. शनिदेवाला निळ्या रंगाच्या गोकर्णाची फुले देखील खूप आवडतात.
भगवान हनुमान यांना संकटनिवारक मानले जातात. भगवान हनुमान मानवावरील कोणत्याही प्रकारच्या संकटांना पराभूत करण्यास सक्षम आहेत. जर तुम्ही मारुतीरायाचे भक्त असाल तर त्यांच्या पूजेच्या वेळी तुम्ही त्यांना झेंडू, कमळ किंवा गुळाची फुले अर्पण करू शकता.
शुक्र गोचरामुळे 9 दिवसानंतर 'या' राशींची होईल आर्थिक भरभराट! तुमची रास आहे का? वाचा
कमळाचे फूल भगवान विष्णूची पत्नी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. तुमच्या सोयीनुसार तुम्ही आईला कोणतेही फूल अर्पण करू शकता, असे म्हणतात. फक्त ती फुले शिळी किंवा कोरडी होणार नाहीत याची काळजी घ्या.
(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)