Navratri 2023 Kanya Pujan : नवरात्री म्हणजे देवीच्या 9 रूपांची विशेष पूजा करण्याची संधी...या नवरात्रीत कन्या पूजेला विशेष महत्त्व असतं. नवरात्रीच्या महाष्टमी आणि महानवमीच्या दिवशी कन्यापूजन आणि उपवास केला जातो. कन्या पूजेशिवाय देवीची आराधना अपूर्ण राहते, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कन्यापूजनाला विशेष महत्त्व आहे. त्यात कुठलीही चूक झाल्यास आपल्या पूजेचं फळ मिळतं नाही. त्यामुळे जाणून घेऊयात शुभ मुहूर्तापासून नियम आणि पूजाविधी बाबत...
नवरात्रीतील अष्टमी तिथी 29 मार्चला आहे. अष्टमी तिथी 28 मार्चला संध्याकाळी 07:02 वाजता सुरू होईल आणि 29 मार्चला रात्री 09:07 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार 29 मार्चला अष्टमीचं व्रत करायचं आहे. तर महानवमी 29 मार्चला रात्री 09:07 पासून सुरू होईल आणि 30 मार्चला रात्री 11:30 पर्यंत राहील. त्यामुळे 30 मार्चला कन्यापूजन करायचं आहे.
शोभन योगाची शुभ मुहूर्त : 28 मार्च रात्री 11:36 मिनिटांनी
शोभन योग समाप्त : 29 मार्च दुपारी 12:13 मिनिटांनी
महाष्टमीला कन्यापूजन केल्यास 29 मार्च 12:13 मिनिटांपर्यंत पूजा करता येईल. या मुहूर्तावर कन्येची पूजा फलदायी ठरते.
ब्रह्म मुहूर्त : 04:42 ते 05:29 पर्यंत
ब्रह्म मुहूर्तामध्ये माँ दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी ॐ ऐं हीं क्लीं चामुण्डायै विच्चे बीज मंत्राचा जप करा, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.
सर्वार्थ सिद्धी योग : 30 मार्च 06:14 am ते 31 मार्च 06:12 am
ब्रह्म मुहूर्त : 04: 41 am ते 05: 28 am
या मुहूर्तावर देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्तिथा, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः मंत्राचा जप करा. त्यामुळे तुमची पूजा पूर्ण होते.
महानवमीला अभिजित मुहूर्त : सकाळी 11:45 ते दुपारी 12:30 पर्यंत. हा दिवस गुरुवार असल्याने रात्री 10.58 पर्यंत पुनर्वसु नक्षत्र राहील. त्यामुळे कन्यापूजेसाठी हा योग अत्यंत शुभ मानला जातो. त्यादिवशी रामनवमी (Ram Navami 2023) पण आहे.
कन्यापूजनासाठी मुलींचं वय दोन वर्षांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंत असावं.
त्यांची संख्या कमीत कमी 9 असावी.
कन्यापूजेत हनुमानजींचं रूप असणारा एक मुलगाही असावा.
कन्यापूजनेच्या वेळी भैरवाची पूजा करावी, अन्यथा तुमची पूजा अपूर्ण राहिल.
महाष्टमी आणि रामनवमी, ज्या दिवशी तुम्हाला कन्यापूजन करायचं असेल, त्या दिवशी सर्वप्रथम माँ दुर्गेची पूजा करा.
आता यानंतर मुलींना आमंत्रण देऊन घरी जेवण्यासाठी बोलवा आणि त्यांना आसन ग्रहण करायला सांगा.
आता मुलींचे पाय स्वच्छ पाण्याने धुवा. नंतर अक्षत आणि फुलांनी अभिषेक करा.
यानंतर मुलींना हलवा, चणे आणि पुरी नैवेद्य अर्पण करा.
मुलींना भोग अर्पण केल्यानंतर त्यांना दक्षिणा द्या आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या.
अगदी लहान मुलालाही जेवणासाठी आमंत्रित करा. बालिकेची पूजा बटूकाशिवाय अपूर्ण मानली जाते, कारण माँ दुर्गासह बटुक म्हणजेच भैरवाची पूजा अनिवार्य आहे.
या मुलींना माँ दुर्गेचे रूप मानलं जातं. अशा वेळी चुकूनही त्यांना शिव्या देऊ नका. वाईट शब्द बोलू नका. मुलींमध्ये भेदभाव करू नका.
अन्न खायला बळजबरी करू नका.
कन्यापूजनेच्या वेळी मुलींना पूर्व दिशेला तोंड करून बसवा. लाल चुणरी अर्पण करा.
कन्यापूजनेच्या अन्नात लसूण, कांदा वापरू नका. जेवणात सर्व मुलींना खीर, पुरी प्रसादासाठी केलेली भाजी खायला द्या.
जेवणानंतर मुलींना दान (दक्षिणा) द्या. फळे, मेकअपचं साहित्य, मिठाई, नारळ इ. या सर्व मुलींचं आशीर्वाद घ्या आणि नंतर उपवास सोडा.