Janmashtami 2023 : 30 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग! 'या'राशींसाठी खूप खास असेल जन्माष्टमी…

Janmashtami 2023 : भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मदिवस म्हणजे जन्माष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे. काही राशींसाठी गोपाळ कृष्णाची कृपा बरसणार आहे.

नेहा चौधरी | Updated: Sep 2, 2023, 08:18 AM IST
Janmashtami 2023 : 30 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग! 'या'राशींसाठी खूप खास असेल जन्माष्टमी… title=
after 30 years janmashtami 2023 will be very special for these zodiac signs shri krishna to give money

Janmashtami 2023 : दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमीची सण साजरा केला जातो. पंचांगानुसार यंदा अष्टमी तिथी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 03:37 वाजता सुरू होईल आणि ती 7 सप्टेंबर रोजी दुपारी 04:14 पर्यंत असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार  तब्बल 30 वर्षांनंतर अद्भुत योगायोग जुळून आला आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीला ग्रह-नक्षत्रांचा विशेष संयोग यंदा दिसणार आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्र असून याच नक्षत्रात लड्डू गोपाळचा जन्म झाला होता. त्यासोबत सवार्थ सिद्धी आणि रवियोगदेखील आहे. तर चंद्र वृषभ राशीत असणार आहे. अशा स्थिती काही मंडळींवर श्रीकृष्णाचा विशेष आशीर्वाद बरसणार आहे. (after 30 years janmashtami 2023 will be very special for these zodiac signs shri krishna to give money)

कर्क (Cancer Zodiac) 

या राशीच्या लोकांवर भगवान श्रीकृष्णाच्या विशेष आशीर्वादांचा प्राप्त होणार आहे. अष्टमीच्या दिवशी विधीपूर्वक पूजा केल्यास तुम्हाला लाभ होणार आहे. तुमच्या सर्व इच्छा श्रीकृष्ण पूर्ण करणार आहे. मृत्यूनंतर मोक्षप्राप्तीचे आशीर्वाद जन्माष्टमीची पूजा करुन तुम्हाला प्राप्त होणार आहे. या दिवशी राधारानी आणि श्रीकृष्णाची एकत्र पूजा केल्यामुळे धनलाभाचे योग आहेत.

सिंह (Leo Zodiac)

सिंह राशीच्या लोकांसाठी यंदाची जन्माष्टमी खूप फलदायी असणार आहे. या काळात तुमची प्रगती होणार असून तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे. बालगोपालांच्या कृपेने तुम्ही यशस्वी आणि समृद्ध होणार आहात. तर कुटुंबात सुख-समृद्धीत वाढ होणार आहे. आर्थिक अडचणीवर मात होणार असून तुम्हाला उत्पन्नाचे नवीन मार्ग गवसणार आहेत. 

वृषभ (Taurus Zodiac) 

वृषभ राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ या काळात मिळणार आहे. यावेळी भगवान श्रीकृष्णाच्या विशेष आशीर्वाद तुम्हाला लाभणार असल्याने तुम्हाला हा वरदानपेक्षा कमी नसणार आहे. परिश्रमाने केलेल्या सर्व कामांमध्ये यश लाभणार आहे. अष्टमीच्या दिवशी मनोभावे राधारानी आणि श्रीकृष्णाची पूजा केल्यामुळे सर्व कामात प्रगती आणि यश प्राप्त होईल. 

हेसुद्धा वाचा - Surya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्य कन्या राशीत करणार प्रवेश! 17 सप्टेंबरपासून 4 राशींची मंडळी असणार शिखरावर

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)