Surya Gochar September 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य देव हा ग्रहांचा राजा मानला जातो. सूर्य हा आत्मा, जीवन आणि उर्जेचा एकमेव स्त्रोत आहे, अशी मान्यता आहे. हा तेजस्वी ग्रह मनुष्याच्या इच्छेवर, चेतनेवर आणि संपूर्ण आत्म्यावर त्याचा प्रभाव असतो असं म्हणतात. तर दुसरीकडे वैज्ञानिकदृष्टीकोनातून भारताने चांद्रयान 3 द्वारे चंद्रावर पाऊल ठेवलं. आता आदित्य एल1 द्वारे सूर्य मोहीम हाती घेतली आहे. आज सूर्यमोहिमेसाठीचं यान अवकाशात झेपवणार आहे.
तर 17 सप्टेंबरला सकाळी 7.11 वाजता सूर्यदेव सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे सूर्य गोचरमुळे 4 राशींच्या आयुष्य हे वरदानापेक्षा कमी नसणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी सूर्य गोचर अतिशय सकारात्मक परिणाम घेऊन आला आहे. राज्यशास्त्र किंवा उच्च पदवी घेणाऱ्यांना याचा जास्त फायदा होणार आहे. या काळात आईचं सहकार्य लाभणार आहे. कोणत्याही संकटावर तुम्ही मात करु शकणार आहात. गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून सूर्य गोचर चांगले परिणाम देणार आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग तुम्हाला गवसणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली होणार आहे.
सूर्य गोचरमुळे तुमच्या व्यावसायिक जीवनात प्रगती होणार आहे. या काळात तुमचं उत्पन्न वाढणार आहे. तुम्ही तुमच्या संवादकौशल्याचा आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेने वापर करुन अनेक गोष्टी सोप्या आणि यशस्वी करणार आहात. सल्लागार, व्याख्याते, मीडिया रिपोर्टर किंवा अशा कोणत्याही व्यवसायात काम करणाऱ्यांना धनलाभाचे योग आहेत. नातेवाईकांसोबत बाहेरगावी जाण्याचा बेत आखणार आहात.
कन्या राशीतील सूर्य गोचर तुमच्या व्यावसायिक जीवनात यश आणि प्रगती घेऊन आला आहे. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती किंवा पगारवाढीची शक्यता आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. सरकारी व्यवहार किंवा व्यवसायात गुंतलेल्या लोकांना सूर्य गोचरमुळे तगडा फायदा होणार आहे. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनाकडून मदत होणार असून तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे.
सूर्य गोचर मकर राशीसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही कुटुंबीयांसोबत किंवा जवळच्या व्यक्तीसोबत तीर्थयात्रेला जाण्याचा बेत आखणार आहात. सूर्य गोचर हा पीएचडी करणार्या किंवा पदव्युत्तर पदवी करणार्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम घेऊन आला आहे. सूर्यदेवाच्या कृपेने या राशीच्या मंडळींना धनलाभ होणार आहे.