नवरात्रीचा आंतरराष्ट्रीय उत्साह

Oct 07, 2013, 21:10 PM IST
1/6

अबू धाबीअमिरातीमधील अबू धाबी हे पहिलं ठिकाण आहे, जिथे सर्वप्रथम दूर्गापूजा साजरी करण्यास सुरूवात झाली. 1985 साली सुरू करण्यात आलेला दूर्गापुजेचा सण वाळवंटी देशातील हिरवळ बनत चालला आहे. पहिली पूजा एका बंगाली घरात साजरी करण्यात आली. मात्र नंतरच्या काळात हा सण भारतीय सांस्कृतिक मंडळांमध्ये साजरा होऊ लागला. संपूर्ण युएईमधील भारतीय लोक या सणासाठी अबु धाबीत जमू लागले. अनेक जण सणाचे पाच दिवस उत्साहाने सणात सहभागी होऊ लागले. मात्र 1990 साली काही कारणास्तव सण साजरा करणं थांबवण्यात आलं. त्यानंतर अबू धाबीत राहाणाऱ्या काही बंगाली बांधवांनी 2007 साली पुन्हा सण साजरा करण्यास सुरूवात केली. AUHBONGS ही संस्था स्थापन करून पुन्हा सण साजरे करण्यास सुरूवात करण्यात आली. आजही अबू धाबीत हा सण थाटामाटात साजरा होत आहे.

अबू धाबी
अमिरातीमधील अबू धाबी हे पहिलं ठिकाण आहे, जिथे सर्वप्रथम दूर्गापूजा साजरी करण्यास सुरूवात झाली. 1985 साली सुरू करण्यात आलेला दूर्गापुजेचा सण वाळवंटी देशातील हिरवळ बनत चालला आहे. पहिली पूजा एका बंगाली घरात साजरी करण्यात आली. मात्र नंतरच्या काळात हा सण भारतीय सांस्कृतिक मंडळांमध्ये साजरा होऊ लागला. संपूर्ण युएईमधील भारतीय लोक या सणासाठी अबु धाबीत जमू लागले. अनेक जण सणाचे पाच दिवस उत्साहाने सणात सहभागी होऊ लागले. मात्र 1990 साली काही कारणास्तव सण साजरा करणं थांबवण्यात आलं. त्यानंतर अबू धाबीत राहाणाऱ्या काही बंगाली बांधवांनी 2007 साली पुन्हा सण साजरा करण्यास सुरूवात केली. AUHBONGS ही संस्था स्थापन करून पुन्हा सण साजरे करण्यास सुरूवात करण्यात आली. आजही अबू धाबीत हा सण थाटामाटात साजरा होत आहे.

2/6

बांग्लादेशबांग्लादेशातील बहुसंख्य जनता ही मुस्लिम असली, तरी हिंदूंचा दुर्गापूजा हा सण तेथे थाटात साजरा होतो. 2007 सालच्या अहवालानुसार, बांग्लादेशात 27,000 ठिकाणी पुजेचे मंडप उभे राहिले होते. यातील 470 पूजा मंडप तर एकट्या ढाका शहरात होते. देशात अल्पसंख्यांक असणारे हिंदू आपला सर्वांत मोठा सण मुस्लिम बंधू भगिनींसोबत दिमाखात साजरा करतात. मुख्य म्हणजे यावरून कुठलाही वाद किंवा दंगे होत नाहीत. आपण बंगाली असल्याची भावनाच त्यांना या काळात बांधून ठेवते.

बांग्लादेश
बांग्लादेशातील बहुसंख्य जनता ही मुस्लिम असली, तरी हिंदूंचा दुर्गापूजा हा सण तेथे थाटात साजरा होतो. 2007 सालच्या अहवालानुसार, बांग्लादेशात 27,000 ठिकाणी पुजेचे मंडप उभे राहिले होते. यातील 470 पूजा मंडप तर एकट्या ढाका शहरात होते. देशात अल्पसंख्यांक असणारे हिंदू आपला सर्वांत मोठा सण मुस्लिम बंधू भगिनींसोबत दिमाखात साजरा करतात. मुख्य म्हणजे यावरून कुठलाही वाद किंवा दंगे होत नाहीत. आपण बंगाली असल्याची भावनाच त्यांना या काळात बांधून ठेवते.

3/6

स्कॉटलंडउत्साह, भावना आणि अभिमान यांच्या संगमाचं प्रतिक असणारा ग्लासगोमधील दुर्गापूजा सण 1981 पासून सुरू झाला आणि वर्षांनुवर्षं त्याचा अवाका वाढत गेला. दुष्प्रवृत्तीवर सत्प्रवृत्तीच्या होणाऱ्या विजयाचचा संदेश देणारा आणि शांतता, सद्भावना यांचं दर्शन घडवणारा हा सण पाच दिवसांत लोकांना एकत्र आणतो. 1981 ते 2013 या 30 वर्षापेक्षा जास्त काळ सुरू असणाऱ्या सणाला पूजा मंडपातील गर्दी वाढतच आहे. 2011 साली तर महाष्टमी अंजलीला हॉलमध्ये शिरायलाही जागा नव्हती. स्कॉटलंडमधील दूर्गापूजा हे भारतीय संस्कृतीचं प्रतिक बनलं आहे. दरवर्षी आधीच्या वर्षापेक्षा भव्य सोहळा करण्याचा प्रयत्न केला जातो आआणि देशापासून दूर असलेल्या बंगाली बांधवांना आपल्या घरी सण साजरा करत असल्याची भावना देऊन जातो.

स्कॉटलंड
उत्साह, भावना आणि अभिमान यांच्या संगमाचं प्रतिक असणारा ग्लासगोमधील दुर्गापूजा सण 1981 पासून सुरू झाला आणि वर्षांनुवर्षं त्याचा अवाका वाढत गेला. दुष्प्रवृत्तीवर सत्प्रवृत्तीच्या होणाऱ्या विजयाचचा संदेश देणारा आणि शांतता, सद्भावना यांचं दर्शन घडवणारा हा सण पाच दिवसांत लोकांना एकत्र आणतो. 1981 ते 2013 या 30 वर्षापेक्षा जास्त काळ सुरू असणाऱ्या सणाला पूजा मंडपातील गर्दी वाढतच आहे. 2011 साली तर महाष्टमी अंजलीला हॉलमध्ये शिरायलाही जागा नव्हती. स्कॉटलंडमधील दूर्गापूजा हे भारतीय संस्कृतीचं प्रतिक बनलं आहे. दरवर्षी आधीच्या वर्षापेक्षा भव्य सोहळा करण्याचा प्रयत्न केला जातो आआणि देशापासून दूर असलेल्या बंगाली बांधवांना आपल्या घरी सण साजरा करत असल्याची भावना देऊन जातो.

4/6

स्कॉटलंड“हा संपूर्ण सोहळाच रोमांचित करणारा असतो. स्कॉटलंडमध्ये अशा पद्धतीने साजरा होणारा दुर्गापूजा हा एकमेव सण असल्याने आपल्या देशापासून, कुटुंबापासून दूर राहाणाऱ्या सर्वच बंगाली लोकांच्या मनात याविषयी विशेष आस्था आहे.” अशी प्रतिक्रिया गेली तीन वर्षं सातत्याने या सोहळ्याला उपस्थित राहाणाऱ्या सतरूपा पंचानन यांनी दिली आहे.

स्कॉटलंड
“हा संपूर्ण सोहळाच रोमांचित करणारा असतो. स्कॉटलंडमध्ये अशा पद्धतीने साजरा होणारा दुर्गापूजा हा एकमेव सण असल्याने आपल्या देशापासून, कुटुंबापासून दूर राहाणाऱ्या सर्वच बंगाली लोकांच्या मनात याविषयी विशेष आस्था आहे.” अशी प्रतिक्रिया गेली तीन वर्षं सातत्याने या सोहळ्याला उपस्थित राहाणाऱ्या सतरूपा पंचानन यांनी दिली आहे.

5/6

स्कॉटलंडसजवलेलं भव्य दुर्गापुजेचा मंडप, असंख्य झांजांचा आवाज, शंखनाद यांनी पाच दिवस दणाणून निघतात. कूपर इन्स्टिट्युट ऑफ ग्लासगोमध्ये होणाऱ्या सोहळ्यात सर्वजण एकत्र जमतात. सप्तमीपासून ते विजया दशमीपर्यंत ग्लासगोतील बंगाल्यांच्या मुक्कामाचा पत्ता एकच असतो- कूपर इन्स्टिट्युटमधील क्लर्कस्टोन हॉल... या सणाची व्यापर्ती एवढी वाढली आहे की आता ग्लासगोतीलच नव्हे, तर संपूर्ण स्कॉटलंडमधील भारतीय प्रवास करून ग्लासगोमध्ये दुर्गापुजेचा उत्सव साजरा करण्यासाठी जमा होतात.

स्कॉटलंड
सजवलेलं भव्य दुर्गापुजेचा मंडप, असंख्य झांजांचा आवाज, शंखनाद यांनी पाच दिवस दणाणून निघतात. कूपर इन्स्टिट्युट ऑफ ग्लासगोमध्ये होणाऱ्या सोहळ्यात सर्वजण एकत्र जमतात. सप्तमीपासून ते विजया दशमीपर्यंत ग्लासगोतील बंगाल्यांच्या मुक्कामाचा पत्ता एकच असतो- कूपर इन्स्टिट्युटमधील क्लर्कस्टोन हॉल... या सणाची व्यापर्ती एवढी वाढली आहे की आता ग्लासगोतीलच नव्हे, तर संपूर्ण स्कॉटलंडमधील भारतीय प्रवास करून ग्लासगोमध्ये दुर्गापुजेचा उत्सव साजरा करण्यासाठी जमा होतात.

6/6

स्कॉटलंडजेव्हा जुन्या आठवणी मनात दाटू येतात, तेव्हा त्यांचे तरंग वातावरणात उमटतात. 1981 साली अशाच काही बंगाली बांधवांच्या समुहाला आपल्या उत्सवाची ओढ शांत बसू देईना. झांजांचा नाद, आरतीचा धूर, मातीची प्रतिमा आणि उत्सवाचं वातावरण पुन्हा अनुभवण्याचा घाट घालत आपल्या मातृभूमीपासून पाच हजार मैल दूर दूर्गापूजेची सुरूवात करण्यात आली. आज ती दुर्गापूजा चांगल्याच मोठ्या प्रमाणावर उत्साहाने साजरी होऊ लागली आहे. ग्लासगोच्या बांगिया सांस्कृतिक परिषद गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ या महोत्सवाचं नेतृत्व करत आहे.

स्कॉटलंड
जेव्हा जुन्या आठवणी मनात दाटू येतात, तेव्हा त्यांचे तरंग वातावरणात उमटतात. 1981 साली अशाच काही बंगाली बांधवांच्या समुहाला आपल्या उत्सवाची ओढ शांत बसू देईना. झांजांचा नाद, आरतीचा धूर, मातीची प्रतिमा आणि उत्सवाचं वातावरण पुन्हा अनुभवण्याचा घाट घालत आपल्या मातृभूमीपासून पाच हजार मैल दूर दूर्गापूजेची सुरूवात करण्यात आली. आज ती दुर्गापूजा चांगल्याच मोठ्या प्रमाणावर उत्साहाने साजरी होऊ लागली आहे. ग्लासगोच्या बांगिया सांस्कृतिक परिषद गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ या महोत्सवाचं नेतृत्व करत आहे.