दर्शन विदर्भातल्या अष्टविनायकांचं...

Sep 10, 2013, 17:47 PM IST
1/8

चिंतामणी, कळंब, जिल्हा यवतमाळविदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेलं हे गणपतीचे मंदिर यवतमाळ नागपूर या राज्य महामार्गावर यवतमाळ शहरापासून सुमारे २३ कि. मी. अंतरावर असलेल्या कळंब गावात आहे. चिंतामणीचं मंदिर गावाच्या सामान्य भूपाताळीपेक्षा सुमारे ३५ फु. खोल आहे. मंदिराच्या प्रवेश द्वारातून पायऱ्या उतरून खाली गेल्यावर समोर एक कुंड दिसते. या कुंडाला गणेशकुंड असं म्हणतात. यातून सुमारे दर १२ वर्षांनी आपोआप पाणी वर येतं. हे कुंड गणपतीनं अंकुशाच्या प्रहारानं तयार केलं तर या मंदिराची स्थापना देवराज इंद्रानं केली असल्याचं मानतात.

चिंतामणी, कळंब, जिल्हा यवतमाळ

विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेलं हे गणपतीचे मंदिर यवतमाळ नागपूर या राज्य महामार्गावर यवतमाळ शहरापासून सुमारे २३ कि. मी. अंतरावर असलेल्या कळंब गावात आहे. चिंतामणीचं मंदिर गावाच्या सामान्य भूपाताळीपेक्षा सुमारे ३५ फु. खोल आहे. मंदिराच्या प्रवेश द्वारातून पायऱ्या उतरून खाली गेल्यावर समोर एक कुंड दिसते. या कुंडाला गणेशकुंड असं म्हणतात. यातून सुमारे दर १२ वर्षांनी आपोआप पाणी वर येतं. हे कुंड गणपतीनं अंकुशाच्या प्रहारानं तयार केलं तर या मंदिराची स्थापना देवराज इंद्रानं केली असल्याचं मानतात.

2/8

अष्टदशभुज, रामटेकनागपूर जिल्ह्यातील रामटेक गावात तेलीपुऱ्यात असलेलं एक प्राचिन मंदिर. हे गाव नागपूरहून सुमारे ४६ कि.मी. अंतरावर आहे. या मंदिरात असलेली मूर्ती गणपतीची असून त्याला अठरा हात आहेत. या प्रतिमेची उंची सुमारे १ मीटर आहे. हातात अंकुश, पाश, त्रिशुल इत्यादी आयुधं आहेत. ही अकराव्या अथवा बाराव्या शतकातली असावी, असा अंदाज आहे.

अष्टदशभुज, रामटेक
नागपूर जिल्ह्यातील रामटेक गावात तेलीपुऱ्यात असलेलं एक प्राचिन मंदिर. हे गाव नागपूरहून सुमारे ४६ कि.मी. अंतरावर आहे. या मंदिरात असलेली मूर्ती गणपतीची असून त्याला अठरा हात आहेत. या प्रतिमेची उंची सुमारे १ मीटर आहे. हातात अंकुश, पाश, त्रिशुल इत्यादी आयुधं आहेत. ही अकराव्या अथवा बाराव्या शतकातली असावी, असा अंदाज आहे.

3/8

सर्वतोभद्र, पवनी, जिल्हा भंडाराभंडारा जिल्ह्यातील पवनी इथला एक स्तंभ. यास गणेशपट्ट असंही म्हणतात. तिथं राहणार्याु श्री. भट यांच्या घरासमोर ओसरीमध्ये हा सुमारे ९० से. मी. उंच स्तंभ आहे. याच्या चारही बाजुस वेगवेगळ्या गणेश प्रतिमा आहेत. तर कर्णछेदरेषेवर पाचवी प्रतिमा आहे. हा वैशिष्ट्यपूर्ण आहे.

सर्वतोभद्र, पवनी, जिल्हा भंडारा
भंडारा जिल्ह्यातील पवनी इथला एक स्तंभ. यास गणेशपट्ट असंही म्हणतात. तिथं राहणार्याु श्री. भट यांच्या घरासमोर ओसरीमध्ये हा सुमारे ९० से. मी. उंच स्तंभ आहे. याच्या चारही बाजुस वेगवेगळ्या गणेश प्रतिमा आहेत. तर कर्णछेदरेषेवर पाचवी प्रतिमा आहे. हा वैशिष्ट्यपूर्ण आहे.

4/8

वरदविनायक, भद्रावती, जिल्हा चंद्रपूरचंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती गावाजवळील गवराळा इथं असलेलं एक मंदिर. हे गाव भद्रावतीहून सुमारे ३ कि.मी. अंतरावर आहे. तिथं टेकडीवर हे मंदिर आहे. या मंदिरात असलेली मूर्ती गणपतीची असून भव्य आहे. ही मूर्ती विहिरीसारख्या खोल गाभार्यावत आहे. हे मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैली पद्धतीचं आहे. मंदिराचं बांधकाम १२व्या शतकातलं वाटतं पण मूर्ती त्याहून प्राचिन असावी.

वरदविनायक, भद्रावती, जिल्हा चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती गावाजवळील गवराळा इथं असलेलं एक मंदिर. हे गाव भद्रावतीहून सुमारे ३ कि.मी. अंतरावर आहे. तिथं टेकडीवर हे मंदिर आहे. या मंदिरात असलेली मूर्ती गणपतीची असून भव्य आहे. ही मूर्ती विहिरीसारख्या खोल गाभार्यावत आहे. हे मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैली पद्धतीचं आहे. मंदिराचं बांधकाम १२व्या शतकातलं वाटतं पण मूर्ती त्याहून प्राचिन असावी.

5/8

भृशुंड, मेंढा, जिल्हा भंडाराभंडारा जिल्ह्यातील मेंढा गावात असलेले एक मंदिर. हे गाव भंडार्यााहून सुमारे ३ कि. मी. अंतरावर आहे. तिथं घुमटीत गणेश प्रतिमा आहे. या मंदिरात असलेली मूर्ती गणपतीची असून लाल रंगाच्या दगडात कोरलेली ही मूषकारुढ प्रतिमा आहे. हातात पाश, अंकुश ही आयुधं आणि मोदक आहे. नेसलेलं वस्त्र, जानवं आणि कंबरपट्टा पण दिसतो.

भृशुंड, मेंढा, जिल्हा भंडारा
भंडारा जिल्ह्यातील मेंढा गावात असलेले एक मंदिर. हे गाव भंडार्यााहून सुमारे ३ कि. मी. अंतरावर आहे. तिथं घुमटीत गणेश प्रतिमा आहे. या मंदिरात असलेली मूर्ती गणपतीची असून लाल रंगाच्या दगडात कोरलेली ही मूषकारुढ प्रतिमा आहे. हातात पाश, अंकुश ही आयुधं आणि मोदक आहे. नेसलेलं वस्त्र, जानवं आणि कंबरपट्टा पण दिसतो.

6/8

शमी विघ्नेश, आदासा, नागपूरसावनेर—कळमेश्वर मार्गावर नागपूरच्या वायव्येकडं ४३ किलोमीटर अंतरावर असलेलं आदासा हे अतिशय लहानसं गाव. अनेक प्राचिन आणि ऐतिहासिक मंदिरांसाठी हे गाव प्रख्यात आहे. अतिशय प्राचिन आदासा गणपती हे इथलं मुख्य मंदिर आहे. अष्टविनायकांपैकी एक अशी या मंदिराची ओळख आहे. १२ फूट उंच आणि ७ फूट व्याप्ती असलेला आदासा गणपती स्वयंभू प्रगट झाला असल्याचं म्हटलं जातं. या मंदिराशिवाय, सुमारे १० हेक्टरच्या या परिसरात आणखी २० लहान मंदिरंही आहेत. गावाला लागूनच एक टेकडी आहे आणि त्यावर महादेवाचं मंदिर आहे. यात तीन स्वयंभू लिंग असून, ती जमिनीतून वर आली असल्याचं बोललं जातं.

शमी विघ्नेश, आदासा, नागपूर
सावनेर—कळमेश्वर मार्गावर नागपूरच्या वायव्येकडं ४३ किलोमीटर अंतरावर असलेलं आदासा हे अतिशय लहानसं गाव. अनेक प्राचिन आणि ऐतिहासिक मंदिरांसाठी हे गाव प्रख्यात आहे. अतिशय प्राचिन आदासा गणपती हे इथलं मुख्य मंदिर आहे. अष्टविनायकांपैकी एक अशी या मंदिराची ओळख आहे. १२ फूट उंच आणि ७ फूट व्याप्ती असलेला आदासा गणपती स्वयंभू प्रगट झाला असल्याचं म्हटलं जातं.

या मंदिराशिवाय, सुमारे १० हेक्टरच्या या परिसरात आणखी २० लहान मंदिरंही आहेत. गावाला लागूनच एक टेकडी आहे आणि त्यावर महादेवाचं मंदिर आहे. यात तीन स्वयंभू लिंग असून, ती जमिनीतून वर आली असल्याचं बोललं जातं.

7/8

टेकडीचा गणपती, नागपूरनागपूर शहरात मध्यवर्ती असलेलं सिताबर्डी नावाच्या टेकडीवरचं हे मंदिर. साधंच परंतु ऐसपैस असं आहे. झाडाच्या प्रचंड मोठ्या बुंध्याशी शांतपणे टेकून बसलेली वाटावी अशी गणपतीची भव्य मूर्ती मंदिरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेते.डोक्यावर मोठ्ठा मुकुट धारण केलेली आणि मंदिरात कुठूनही थेट दर्शन होणारी ही मूर्ती आहे. गणपतीच्या डोक्यावर गंधाच्या ठिकाणी लाल रंगाचा चमचमता हिरा आहे. पूर्वी हे मंदिर हेमाडपंथी होतं. पण परकीय आक्रमणात ते उद्ध्वस्त झालं. त्यानंतर काही काळानं १८६६ साली ती मूर्ती पुन्हा सापडली आणि तिथं मंदिर बांधण्यात आलं. हा गणपती नागपूरकरांचं आराध्य दैवत आहे. माघ महिन्यातील चतुर्थीला इथं मोठा उत्सव असतो लाखोंच्या संख्येनं भक्त या काळात गणपतीच्या दर्शनाला येतात.

टेकडीचा गणपती, नागपूर
नागपूर शहरात मध्यवर्ती असलेलं सिताबर्डी नावाच्या टेकडीवरचं हे मंदिर. साधंच परंतु ऐसपैस असं आहे. झाडाच्या प्रचंड मोठ्या बुंध्याशी शांतपणे टेकून बसलेली वाटावी अशी गणपतीची भव्य मूर्ती मंदिरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेते.
डोक्यावर मोठ्ठा मुकुट धारण केलेली आणि मंदिरात कुठूनही थेट दर्शन होणारी ही मूर्ती आहे. गणपतीच्या डोक्यावर गंधाच्या ठिकाणी लाल रंगाचा चमचमता हिरा आहे. पूर्वी हे मंदिर हेमाडपंथी होतं. पण परकीय आक्रमणात ते उद्ध्वस्त झालं. त्यानंतर काही काळानं १८६६ साली ती मूर्ती पुन्हा सापडली आणि तिथं मंदिर बांधण्यात आलं. हा गणपती नागपूरकरांचं आराध्य दैवत आहे. माघ महिन्यातील चतुर्थीला इथं मोठा उत्सव असतो लाखोंच्या संख्येनं भक्त या काळात गणपतीच्या दर्शनाला येतात.

8/8

सिद्धिविनायक, केळझर, जिल्हा वर्धाविदर्भातील अष्टविनायकांपैकी तिसऱ्या क्रमांकावर असलेलं वर्धा जिल्ह्यातील केळझर गाव श्री. सिद्धीविनायकासाठी प्रसिद्ध आहे. इथला गणपती उजव्या सोंडेचा असून मूर्ती ४ फुट उंचीची आहे. केळझर गावाची प्राचीनता महाभारत कालीन आहे.

सिद्धिविनायक, केळझर, जिल्हा वर्धा
विदर्भातील अष्टविनायकांपैकी तिसऱ्या क्रमांकावर असलेलं वर्धा जिल्ह्यातील केळझर गाव श्री. सिद्धीविनायकासाठी प्रसिद्ध आहे. इथला गणपती उजव्या सोंडेचा असून मूर्ती ४ फुट उंचीची आहे. केळझर गावाची प्राचीनता महाभारत कालीन आहे.