महाराष्ट्राची गंगा.. भागीरथी गंगा पृथ्वीवर अवतारण्याआधीच नाशिकमध्ये झाला सर्वात मोठ्या नदीचा उगम

गोदावरी महाराष्ट्राची गंगा म्हणून ओळखली जाते. जाणून घेऊया  गोदावरी नदीला अध्यात्मिक इतिहास

Feb 05, 2025, 23:31 PM IST

Maharashtra Godavari River : गंगा नदी ही भारतातील सर्वात पवित्र नदी मानली जाते. त्याचप्रमाणे गोदावरी नदी ही महाराष्ट्राची गंगा म्हणून ओखळली जाते. गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे.

1/7

महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी महाराष्ट्राची गंगा म्हणून ओळखली जाते.  भागीरथी गंगा पृथ्वीवर अवतारण्याआधीच झालाय  या सर्वात मोठ्या नदीचा उगम झाला आहे. जाणून घेऊया या नदी विषयी.  

2/7

 नाशिकमधील गोदावरी पात्रात एकूण प्राचीन 17 कुंड आहेत. यापैकी रामकुंड, सीताकुंड ही पवित्र कुंड आहेत.   

3/7

गोदावरी नदीच्या काठावरच नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो. देशभरातील साधू, संत-महंत व भाविक स्नानासाठी येतात. म्हणूनच गोदावरीला गंगे इतकेच महत्त्व आहे.  

4/7

महाराष्ट्रामधून वाहतांना गोदावरी नदी नाशिक, औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड या जिल्हातून वाहणारी ही नदी थेट आंध्रप्रदेश मध्ये राज्यात प्रवेश करते.

5/7

भागीरथी गंगा पृथ्वीवर अवतारण्याचा अगोदर गोदावरीचा उगम झाला अशी अख्यायिका आहे. यामुळेच या नदीला अध्यात्मिक महत्व प्राप्त झाले आहे.

6/7

गोदावरी ही महाष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदी ही दक्षिणेतील गंगा म्हणून ओळखली जाते.गंगा नदीनंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत लांब नदी गोदावरी आहे.   

7/7

या नदीचे नाव आहे गोदावरी. पश्चिम घाटातील सहयाद्रीच्या पर्वत रांगेतील ब्रह्मगिरी येथे गोदावरी नदीचा उगम झाला.