1/8
![नारळनारळालाच श्रीफळ असंही म्हणतात. विविध कार्यक्रमांत श्रीफळ पवित्र मानलं जातं. नारळाचं वैशिष्ट्यं म्हणजे त्याच्या प्रत्येक भाग कशा न कशासाठी तरी उपयोगी पडतो... मग ते खोबरं असू द्या किंवा कवटी...गणेशपुजेत नारळ हे भगवान शंकराची उपस्थितीचं प्रतिक मानलं जातं. नारळ म्हणजे देवांचा आशिर्वादच समजला जातो.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2014/06/14/50187-coconut.jpg)
2/8
![लाल जास्वंदलाल जास्वंद म्हणजे गणेशाचं आवडतं फूल... अतिशय तेजस्वी असं फूल आनंददायी आणि सुगंधित असल्याचं जाणवतं. ताजी लाल फूलं ही सुंदरता, शुद्धता, सुगंध आणि नम्रतेचं प्रतिक मानलं जातं.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2014/06/14/50185-hibiscus.jpg)
3/8
![सुपारीसुपारी हे अहंकाराचं प्रतिक मानलं जातं. आपला अहंकार सोडून शुद्ध भावनेनं देवाला शरण जाण्याची शिकवण यातून दिली जाते. आपण कितीही मोठे असलो तरी देवासमोर आपण नम्र भावनेनंच शरण जायला हवं.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2014/06/14/50181-betel.jpg)
4/8
![कुंकू आणि चंदनसिंदूर किंवा कुंकू शुध्दीकरणासाठी आणि संरक्षणासाठी गणेशपुजनात वापरलं जातं. तर चंदनी लाकूड त्याच्या सुगंध आणि थंड प्रभावासाठी प्रसिध्द आहे. दररोज, पूजेनंतर गणेशाच्या कपाळावर चंदनाचा टीळा लावला जातो.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2014/06/14/50177-kumkum.jpg)
5/8
![मौली – लाल धागामौली किंवा कलावा म्हणजेच सुती लाल रंगाचा धागा... हा धागा अत्यंत पवित्र मानला जातो. देवाला अर्पण करण्यात आलेल्या वस्त्राचं प्रतिक म्हणून हा धागा वापरला जातो. हा लाल धागा कलशाच्या भोवती गुंडाळला जातो. मौली हिंदूंच्या अनेक सणांमध्ये आणि पवित्र विधींमध्ये वापरला जातो.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2014/06/14/50175-mouli.jpg)
6/8
![२१ दुर्वादुर्वा समृद्धीचं आणि नवनिर्माणाचं प्रतीक मानल्या जातात. चांगले बदल, नवनिर्माण आणि पुननिर्मितीचं प्रतिक म्हणजेच दुर्वा...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2014/06/14/50171-durva.jpg)
7/8
![अगरबत्ती आणि दिवासुगंधीत अगरबत्तीनं गणपती बाप्पाला ओवाळलं जातं... हा अगरबत्तीचा सुगंध संपूर्ण वातावरणही सुगंधीत आणि भक्तीमय करतो. अनेक ठिकाणी गणपतीसमोर तेजोमय दिवा कायम ठेवला जातो. आरती संपल्यानंतर संपूर्ण परिसरात धूप जाळून संपूर्ण परिसरात त्याचा सुगंध फिरवला जातो.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2014/06/14/50112-lamp.jpg)
8/8
![मोदकगूळ आणि नारळाचा उकडीचा मोदक... अनेक जण चट्टा-मट्टा करून संपवतात. हाच मोदक आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचाही आवडीचा पदार्थ आहे, हेही तुम्हाला माहिती असेल. गणेश पुजेमध्ये मोदक नाही असं होणारच नाही.गणेश प्रतिष्ठापनेच्या वेळीही २१ मोदकांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा प्रचलित आहे.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2014/06/14/50108-modak.jpg)