सागर आव्हाड, पुणे : राज्यातले तब्बल 7800 शिक्षक बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 उमेदवारांना पैसे घेऊन पास केल्याचं उघड झाल आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019-20 मध्ये घेतलेल्या टीईटी परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून 2018 मध्येही परीक्षेत मोठ्या प्रमाणात अपात्र परीक्षार्थींकडून पैसे घेऊन पात्र ठरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्य परीक्षा परिषदेकडून आलेला मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांनी केली. 50 ते 60 हजार रूपये घेऊन अपात्रांना पात्र केल्याचे उघडकीस आले आहे.
टीईटी परीक्षेत घोटाळेबाजांनी उमेदवारांकडून 50 ते 60 हजार रुपये घेऊन त्यांना पात्र ठरवल्याचं समोर आल्यानं शिक्षण क्षेत्रात खळबळ उडालीय. 'झी 24 तास'नं सर्वात आधी हा मुद्दा उचलून धरला होता.
2018 आणि 2019 च्या टीईटी परीक्षेत मोठ्या प्रमाणात हा गैरव्यवहार झालाय. राज्य परीक्षा परिषदेकडून आलेला मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांनी केली.
त्यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आलीय...या बोगस शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचं भवितव्यही धोक्यात आहे...