'झी मराठी'च्या आपल्या लाडक्या जोड्यांचं प्रेमाचं केळवण; पाहा फोटो

Zee Marathi TV Show Latest News: लग्न म्हटलं की मराठी कुटुंबात खूप प्रेमाने आणि आपुलकीने सगळे विधी पारंपरिक पद्धतींनी पार पाडले जातात. असाच एक विधी म्हणजे केळवणाचा जो लग्नाच्या आधी नातेवाईक आणि मित्र परिवार नवं दाम्पत्यासाठी करतात.

May 30, 2024, 18:26 PM IST
1/7

झी मराठीवरील गाजत असलेल्या आपल्या लाडक्या जोड्या म्हणजेच एजे-लीला, आकाश-वसुंधरा, आशु-शिवा आणि पारू-आदित्य ह्यांचा केळवण सोहळा केळवण सोहळा झी मराठीने आपल्या प्रेक्षकांसोबत पार पाडला.    

2/7

या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं  प्रणव रावराणे आणि अंकिता मेस्त्री हिने  

3/7

आशुला तर चक्क एका काकूंनी शिवाला आपल्या प्रेमाची कबुली कशी दिली पाहिजे हे शिकवले

4/7

तर कोणी  लीलाला एजेला  हसववण्याचा सल्ला दिला. आकाशने उखाण्याच्या खेळात बाझी मारली तर उखाण्याच्या खेळात लीलाने, वसुंधरेच्या गुरुची भूमिका पार पाडली. 

5/7

उपथित असलेल्या बायकांनी ह्या जोड्यांचं औक्षण केले, हेच नाही तर आशीर्वाद ही इथे वेगळ्या पद्धतींनी दिले गेले.

6/7

 काही महिलांनी होणाऱ्या  वर-वधूला मोलाचे सल्ले  दिले. येणाऱ्या नव्या आयुष्याची सुरवात कशी करावी नव नातं कसे  बहरेल या विषयी देखील सांगितले गेले. 

7/7

उत्कृष्ट जेवणानंतर आलेल्या पाहुण्यांसाठी खास भेट ही दिली गेली. केळवण तर ह्या जोड्यांचे झाले पण ह्यांचे लग्न नेमकं कसं पार पडेल ? ह्या प्रश्नाचं उत्तर सर्वाना २७ मे पासून झी मराठीवर सुरु असलेल्या विवाह विशेष सप्ताहात पाहायला मिळेल.